अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाला ट्रम्प प्रशासनाने दणका दिला आहे. व्हाईट हाऊसने हार्वर्ड विद्यापीठाला दिले जाणारे २.२ अब्ज डॉलर्सचे अनुदान गोठवले आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाला दिलेले ६० दशलक्ष डॉलर्सचे करार देखील गोठवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
विद्यापीठाच्या कॅम्पसमधील सक्रियता मर्यादित करण्यासाठी आणि विविधता, समानता आणि समावेशन (DEI) कार्यक्रम रद्द करण्यासाठी व्हाईट हाऊसने हावर्ड विद्यापीठाला काही मागण्यांची यादी पाठवली होती. मात्र, या मागण्यांचे पालन करण्यास नकार दिल्यानंतर अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सोमवारी हार्वर्ड विद्यापीठाला दिले जाणारे २.२ अब्ज डॉलर्सचे अनुदान गोठवले आहे. या फ्रीझमध्ये २.२ अब्ज डॉलर्सचे अनुदान आणि ६० दशलक्ष डॉलर्सच्या करारांचा समावेश आहे.
हार्वर्डचे अध्यक्ष अॅलन गार्बर यांनी विद्यापीठ समुदायाला पत्र पाठवल्यानंतर काही तासांतच शिक्षण विभागाचे हे विधान आले, ज्यामध्ये ट्रम्प यांच्या मागण्या नाकारल्या गेल्या आणि विद्यापीठाच्या स्वातंत्र्याचे समर्थन करण्यात आले. शिवाय प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले. “विद्यापीठ आपले स्वातंत्र्य सोडणार नाही किंवा आपले संवैधानिक अधिकार सोडणार नाही. कोणत्याही सरकारने, सत्तेत असलेल्या कोणत्याही पक्षाने खाजगी विद्यापीठे काय शिकवू शकतात, कोणाला प्रवेश देऊ शकतात आणि कोणाला कामावर ठेवू शकतात, अभ्यास आणि चौकशीचे कोणते क्षेत्र ते घेऊ शकतात हे ठरवू नये,” असे म्हटले आहे.
३ एप्रिल रोजी हार्वर्डला मिळालेल्या यादीत प्रशासन, भरती पद्धती आणि प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या यादीत अधिकाऱ्यांना विविधता कार्यालये बंद करण्याचे आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले होते.
गेल्या वर्षी इस्रायल-गाझा युद्धादरम्यान अमेरिकन विद्यापीठांमध्ये पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांची लाट दिसून आली, ज्यामध्ये पोलिस आणि इस्रायल समर्थक निदर्शकांमध्ये अनेक संघर्ष झाले. ट्रम्प आणि रिपब्लिकन नेत्यांनी या निदर्शनांना ‘हमास समर्थक’ म्हणून निषेध केला. याशिवाय, ट्रम्प प्रशासनाने कोलंबिया विद्यापीठातील निदर्शनांच्या दोन आयोजकांना लक्ष्य केले आहे. महमूद खलील यांच्यावर हद्दपारीची कारवाई सुरू आहे, तर मोहसेन महदवी यांना सोमवारी अमेरिकन नागरिकत्व प्रक्रियेदरम्यान अटक करण्यात आली. रिपब्लिकन काँग्रेसच्या नेत्या एलिस स्टेफनिक यांनी हार्वर्डला “शैक्षणिक ऱ्हासाचे प्रतीक” म्हटले आहे आणि निधीमध्ये पूर्ण कपात करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा :
इस्रायल- हमासमधील युद्धबंदीची चर्चा फसली; ‘ही’ आहेत कारणे
मध्य प्रदेश: हिंदू धर्माच्या प्रभावामुळे अन्वरने इस्लाम सोडून स्वीकारला सनातन धर्म!
… अन् मोहित्यांना दिसला मोत्यांमध्ये राम
मुर्शिदाबादमधील हिंसाचार, मृत्यूंच्या चौकशीसाठी हवे विशेष पथक
गेल्या वर्षी पॅलेस्टिनी समर्थक निदर्शने सुरू झालेल्या कोलंबिया विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनाच्या दबावानंतर शिस्तभंगाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. असे असूनही, विद्यापीठाला ४०० दशलक्ष डॉलर्स निधी कपातीचा सामना करावा लागला.