राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ट्रुडो पुन्हा बरळले

भारताच्या निर्णयावर केली टीका

राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ट्रुडो पुन्हा बरळले

Canada's Prime Minister Justin Trudeau pauses while responding to questions after delivering an apology in the House of Commons on Parliament Hill in Ottawa, Ontario, Canada, May 19, 2016 following a physical altercation the previous day. (Chris Wattie/Reuters)

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडा आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान, भारताने दिल्लीतील ४१ कॅनडाच्या अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढला. यावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे.

“भारत सरकारने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे दोन्ही देशातील लाखो लोकांचे जीवन संकटात सापडले आहे. भारत आणि कॅनडातील लाखो लोकांसाठी भारत सरकार नेहमीप्रमाणे जगणं कठीण बनवत आहे आणि ते मुत्सद्देगिरीच्या मूलभूत तत्त्वाचेही उल्लंघन ठरत आहे. जगाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. कॅनडाच्या काही राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्याने प्रवास आणि व्यापारात अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच, कॅनडामध्ये शिकणाऱ्या भारतीयांसाठीही अडचणी निर्माण होतील,” अशी टीका जस्टिन ट्रुडो यांनी केली आहे.

कॅनडातल्या एका माजी अधिकाऱ्याने म्हटलं की, “भारताने कॅनडेयिन अधिकाऱ्यांना देश सोडायला सांगणं ही काही सर्वसामान्य घटना नाही. अशी घटना मागच्या ४० ते ५० वर्षात घडली नव्हती. भारतातल्या कॅनडा येथील अधिकाऱ्यांनी देश सोडावा म्हणून १० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, कॅनडा आणि भारत यांच्यात चर्चा सुरु होती त्यामुळे काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा होती. मात्र ही चर्चा अपयशी ठरली.”

हे ही वाचा:

फडणवीसांनी बुरखा नव्हे; कपडेच फाडले!

४३ वर्षांनी बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

चंद्रकात पाटील म्हणाले, माझ्या बॅगेत ८ शर्ट!

आमदार रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची या वर्षी जूनमध्ये सर्रे शहरातील एका गुरूद्वारात हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर कॅनडात राहणाऱ्या खालिस्तानी समर्थकांनी कॅनडा सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यांचे म्हणणे होते की या हत्येमागे भारताचा हात आहे. यानंतर सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत येत निज्जर यांच्या हत्येचा आरोप भारतावर केला. तसेच ओटावामधील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले. परिणामी या कृतीवर भारतानेही संताप व्यक्त करत नवी दिल्लीतील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्यास सांगितले आहे.

Exit mobile version