27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियालंडनमध्ये भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्याने खलिस्तानी समर्थकांना शिकवला धडा

लंडनमध्ये भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्याने खलिस्तानी समर्थकांना शिकवला धडा

खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय उच्चायुक्तालयावर  तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.

Google News Follow

Related

लंडनमध्ये खलिस्तानी कारवाया सुरूच आहेत. काही खलिस्तान समर्थकांनी रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील भारतीय राष्ट्रध्वज उतरवण्याचा प्रयत्न केला. उच्चायुक्तालयामधील एका अधिकाऱ्याच्या धाडसामुळे हा प्रयत्न हाणून पाडला. या अधिकाऱ्याच्या हिमतीमुळे उच्चायुक्तालयावर पुन्हा एकदा तिरंगा डौलाने फडकावला.या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.लोक भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

यावेळी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.खलिस्तान्यांचा हा प्रयत्न भारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याने मोठे धाडस दाखवत हा प्रयत्न हाणून पडला . या अधिकाऱ्याने हिम्मत दाखवत खलिस्तानींना कडाडून विरोध केला. या अधिकाऱ्याने खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांकडून खलिस्तानी झेंडा हिसकावून घेत फेकून दिला. या घटनेनंतर खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय उच्चायुक्तालयावर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.

लंडनमधील घटनेनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनच्या उच्चायुक्तांशी संपर्क साधून लंडनमधील या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय उच्चायुक्तालयाच्या आवारात ही घटना घडली तेव्हा सुरक्षा कर्मचारी तेथून पूर्णपणे गैरहजर होते. याबाबत ब्रिटिश उच्चायुक्तांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. हे व्हिएन्ना कन्व्हेन्शनचेही उल्लंघन असल्याचे सरकारने म्हटले आहे.

हे ही वाचा:

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

कांदिवलीत महारोजगार मेळाव्याने दिल्या नोकऱ्या आणि घसघशीत पगार

वारिस पंजाब दे संघटनेचा खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्यावर पंजाब पोलिसांची धरपकड कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे खलिस्तान समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळेचत्यांच्याकडून निदर्शने करण्यात येत आहेत. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील निदर्शने हा देखील या निषेधाचा एक भाग होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा