27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरदेश दुनियाकॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला श्रद्धांजली

कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला श्रद्धांजली

कपटी चेहरा जगासमोर उघड

Google News Follow

Related

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाने केला होता. याबद्दलचे पुरावे मात्र कॅनडाने दिले नव्हते. यानंतर या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होऊन संबंधही ताणले गेले होते. अशातच आता दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती ठेवणारा कॅनडाचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. कॅनडाच्या संसदेने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरसाठी दोन मिनिटांच मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. मागच्यावर्षी कॅनडामध्ये त्याची हत्या करण्यात आली होती. याआधी कॅनडाने एका नाजी लीडरला सन्मानित केलं होतं.

हरदीप सिंह निज्जरच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून कॅनडाच्या संसदेने मौन पाळून त्याला श्रद्धांजली वाहिली. भारताने हरदीप सिंह निज्जरला दहशतवादी घोषित केलं होतं. खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची मागच्यावर्षी १८ जूनला एका गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हरदीप सिंह निज्जर कॅनडाच्या वँकूवर शहरातील गुरु नानक शीख गुरुद्वाराचा अध्यक्ष होता. हरदीप सिंह निज्जर खलिस्तान आंदोलनाशी जोडलेला भारतीय वंशाचा कॅनेडीयन शिख फुटीरतवादी नेता होता. भारत सरकारकडून त्याला दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं. खालिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेशी तो संबंधित होता.

कॅनडाने नेहमीच भारतविरोधी आणि फुटीरतावादी नेत्यांच समर्थन केल्याचे दिसून आले आहे. मागच्यावर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताचा दौरा केला होता. यानंतर काही दिवसानी त्यांनी कॅनडाच्या संसदेत वक्तव्य केलं होतं. निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकार सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावरून जगभरात खळबळ उडाली होती.

हे ही वाचा..

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शोधताहेत भारत संबंधांमध्ये ‘संधी’

ब्रह्मोस क्षेपणास्त्र अभियंता निशांत अग्रवालच्या लॅपटॉपमधून गोपनीय डेटा मिळविण्यासाठी पाकिस्तानी हेरांकडून तीन ॲप्सचा वापर!

मुख्यमंत्री पिनाराई विजयन, मुलगी वीणा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाची नोटीस!

‘हमारे बारह’ चित्रपटात मुस्लिम समाजाविरुद्ध काहीही नाही!

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे प्रमुख जस्टिन ट्रूडो यांची इटलीमध्ये जी-७ परिषदेदरम्यान भेट घेतली होती. यावेळी या बैठकीबद्दल बोलताना ट्रूडो म्हणाले की, त्यांना आर्थिक संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षेसह नव्या सरकारशी संलग्न होण्याची संधी दिसत असल्याचे म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा