नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

दिल्लीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

३ नोव्हेंबर रोजी झालेल्या भूकंपातून हिमालयातील राष्ट्र सावरत असताना सोमवारी संध्याकाळी नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला.या भूकंपात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून या दुर्घटनेत १५३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.नेपाळसह दिल्ली-एनसीआरमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

नेपाळमध्ये गेल्या चार दिवसांत हा तिसरा भूकंप आहे. दिल्ली-एनसीआर क्षेत्रासह उत्तर भारताच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.शुक्रवारी झालेल्या भूकंपाने पश्चिम नेपाळमधील जाजरकोट आणि रुकुम पश्चिम जिल्ह्यांना धडक दिली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,या भूकंपामध्ये सार्वजनिक आणि खाजगी अशा सुमारे ८,००० घरांचे नुकसान झाले आहे.भारताने मदतीचा हात पुढे करत नेपाळला सुरक्षा व्यक्तींच्या पथकासह आपत्कालीन मदतीच्या साहित्याने भरलेले दोन ट्रक उत्तर-पश्चिम पर्वतीय प्रदेशाकडे पाठवण्यात आले.या ट्रक मध्ये लोकांसाठी अन्न, कपडे आणि औषधांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!

महादेव बेटिंग ऍपवर केंद्र सरकारची बंदी!

तसेच १० कोटी रुपयांच्या आपत्कालीन मदत सामग्रीची पहिली खेप घेऊन भारतीय हवाई दलाचे विशेष C-१३० विमान रविवारी नेपाळमध्ये दाखल झाले .या मदत सामग्रीमध्ये ६२५ युनिट प्लास्टिक ताडपत्री आणि तंबू, १,००० युनिट स्लीपिंग बॅग, १,००० ब्लँकेट, ७० मोठ्या आकाराचे तंबू, ३५ तंबू उपकरणे, औषधे आणि ४८ इतर वस्तूंचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version