भारत-अमेरिका संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी चार भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षित केले जाईल आणि त्यापैकी एक पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाईल, असे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी बुधवारी सांगितले.
‘या संदर्भातील प्रशिक्षण चौघांना परदेशात मिळेल आणि त्यातील दोघांना नासा येथे प्रशिक्षण दिले जाईल,’ असे मंगळवारी सोमनाथ यांनी सांगितले. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी चांद्रयान-३ मोहिमेसाठी भारताचे कौतुक करताना अमेरिका भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी मदत करेल, असे जाहीर केले. सोमनाथ राजभवनात बोलत होते. येथे त्यांचा पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तरुण पिढीला अंतराळ प्रवासाची आवड निर्माण करण्यासाठी गावोगावी जनजागृती मोहीम राबवली पाहिजे, असे सोमनाथ यांनी सांगितले. “इस्रो आता मानवी चांद्र मोहिमेची योजना आखत आहे. या अंतर्गत २०४० पर्यंत एक अंतराळवीर चंद्रावर उतरू शकेल आणि सुरक्षितपणे परत येईल, अशी योजना आहे,’ अशी त्यांनी माहिती दिली.
हे ही वाचा:
बंधुभावानेच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद टिकवला
टाटा टेक्नॉलॉजीची दणक्यात लिस्टिंग; गुंतवणूकदारांनी एका शेअरवर जवळपास ७०० रुपये कमावले
फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!
मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!
ते म्हणाले की, इस्रोने चांद्रयान-३ द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगसह नवे लक्ष्य साध्य केले. या एका पराक्रमामुळे भविष्यातील मोहिमांना चालना मिळेल, चांद्रयान-३ चा प्रयोग चांद्रमोहिमांना नवीन उंचीवर नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वीच्या चांद्रयान मोहिमांनी दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करण्यात भूमिका बजावली होती, याकडे लक्ष वेधून आम्ही या प्रयोगांमुळे आनंदी आहोत. आपण आता जगावर प्रभाव टाकण्यास सक्षम आहोत, असा दुर्दम्य आशावाद सोमनाथ यांनी व्यक्त केला.