भारताच्या पहिल्या मानव अवकाश मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातून चार वैमानिकांची निवड करण्यात आली होती. त्यांना रशियामध्ये अवकाश प्रशिक्षणासाठी पाठण्यात आले होते. तिथले प्रशिक्षण पूर्ण करून हे अंतराळवीर परत आले असून, भारतीय बनावटीच्या मोड्युलसाठी त्यांचे प्रशिक्षण लवकरच सुरू होणार आहे.
अवकाश मोहिमेसाठी निवड झालेले चारही वैमानिक आता इस्रोच्या अंतर्गत काम करत आहेत. त्यांना भारतीय बनावटीच्या मोड्युलमधून प्रवास करायचा असल्याने भारतीय वातावरणात त्यांचे प्रशिक्षण सुरू होईल. हे प्रशिक्षण देशाच्या विविध शहरांत होणार आहे. इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी याबाबत पुष्टी केली आहे.
हे ही वाचा:
हा तर ठाकरे सरकारच्या अपयशाचा उद्रेक
मदरशांमधील मुलांचे मौलानानेच केले लैंगिक शोषण
पाकिस्तानी मुलीला पालकांनीच दिली खुनाची धमकी…वाचा नेमके काय घडले
रशियामध्ये झालेले प्रशिक्षण हे सामान्य अथवा ओळख अशा स्वरूपाचे होते. आता खास भारतीय मोड्यूलशी त्यांचा परिचय करून दिला जाईल.
गगनयानाशी निगडीत विशिष्ट प्रशिक्षण बंगळूरूमध्ये होणार आहे. याबरोबरच चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये पाण्याशी निगडीत विविध प्रशिक्षण होणार आहे.
सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियातील प्रशिक्षणापेक्षा भारतीय प्रशिक्षणाचा कालावधी अधिक मोठा असेल. त्यांना लाँच व्हेहिकल, उड्डाण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा इत्यादींवर भरपूर सराव करून घेतला जाणार आहे. या तांत्रिक शिक्षणासोबतच त्यांचे मानसशास्त्रीय, वैद्यकीय प्रशिक्षण देखील केले जाणार आहे. त्याबरोबरच शून्य गुरूत्वाकर्षण वातावरणात येणारा ताण हाताळण्याचे देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या सर्वांबरोबरच इस्रो अत्याधुनिक दर्जाचे सिम्युलेटर खरेदी करत आहे, अथवा बनवत आहे. त्यावर उत्तम दर्जाचे प्रशिक्षण इस्रो आपल्या अवकाशवीरांना देणार आहे.