जगाच्या व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा सुवेझ कालवा आज बंद झाला होता. यात दक्षिण दिशेने येणारे एक मोठे मालवाहू जहाज अचानक किनाऱ्यावरील गाळात अडकल्याने या कालव्यातील वाहतूक बंद झाली होती.
आज या कालव्यात एक मोठे जहाज अचानक अडकून पडले. एव्हरग्रीन मरिन कॉर्प या कंपनीचे सुमारे ४००मी. लांबीचे एक जहाज जोरदार वाऱ्यांच्या झोतामुळे कालव्याच्या किनाऱ्यावर धडकले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी होणाऱ्या व्यापाराला अडथळा निर्माण झाला. द गार्डियनच्या वृत्तानुसार या जहाजाला सोडवण्याचे आणि पुन्हा तरंगवत ठेवण्याचे अनेक प्रयत्न फसले. सुमारे आठ टगबोट्सचा वापर करून हे जहाज पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न झाला. भरतीच्या वेळेपर्यंत जर जहाज पूर्ववत झाले नसते, तर त्याला सरळ करणे खूप अवघड झाले असते. सुवेझ कालव्याच्या अधिकृत प्रशासनाकडून या जहाजाच्या नेमक्या परिस्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
हे ही वाचा:
वाझेचा मित्र काझीच होणार सरकारी साक्षीदार
ममता-भाजपा अंतर केवळ दीड टक्का
हे जहाज सध्या बीएसएम नावाच्या एका व्यापारी कंपनीकडून वापरले जात होते. या जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हे जहाज कालव्याच्या दक्षिण टोकाच्या जवळ विचित्र स्थितीत अडकले होते. त्यामुळे युरोपच्या दिशेने जाणाऱ्या अनेक टँकर्सची गर्दी लाल समुद्रात होऊ लागली. अनेक तज्ञांच्या मते या जहाजामुळे आशिया-युरोप व्यापाराला मोठा फटका बसला.
इजिप्त मधील सुवेझ कालवा लाल समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा चिंचोळा कालवा आहे. आशिया आणि युरोप यांच्यातील बहुतांश व्यापार या कालव्यावर अवलंबून असतो.