गुहागारच्या कासवाचा श्रीलंका दौरा

उपग्रह टॅग केलेल्या कासवाचा प्रवास

गुहागारच्या कासवाचा श्रीलंका दौरा

गुहागारच्या किनाऱ्यावर उपग्रह टॅग केलेल्या एका कासवाने थेट श्रीलंका गाठल्याची माहिती समोर आली आहे. ‘बागेश्री’ या ऑलिव्ह रिडले कासवाने अवघ्या चार महिन्यात महाराष्ट्राच्या किनापट्टीवरून श्रीलंकेची किनारपट्टी गाठली आहे. या कासवाने गुहागर ते कन्याकुमारी असा प्रवास करुन ती श्रीलंकेच्या पाण्यात उतरल्याची माहिती आहे.

भारतीय वन्यजीव संस्थेची टीम, मँग्रोव्ह फाउंडेशनचे सदस्य आणि महाराष्ट्र वनविभागाच्या रत्नागिरी विभागाच्या पथकाने २१ फेब्रुवारीला गुहागर समुद्रकिनाऱ्यावर गस्त घातली होती. त्यावेळी या समुद्रकिनाऱ्यावर घरटी बांधण्यासाठी आलेल्या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी बांधून झाल्यानंतर २२ फेब्रुवारीला त्यांना सॅटेलाईट टॅग बसवण्यात आले. त्यांना बागेश्री आणि गुहा अशी नावे देण्यात आली होती. नंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.

त्यानंतर या बागेश्रीचा प्रवास समजून घेतला असता हे मादी कासव आता श्रीलंकेपर्यंत पोहचले आहे. गुहागर ते कन्याकुमारी असा प्रवास करुन ती श्रीलंकेच्या पाण्यात सध्या आहे. तर सोबतच टॅग करण्यात आलेले ‘गुहा’ हे मादी ऑलिव्ह रिडले कासव लक्षद्वीपपर्यंत जाऊन परत आले आणि आता ते कर्नाटक किनाऱ्याच्या आसपास आहे.

हे ही वाचा:

चांद्रयान ३ झेपावणार १४ जुलैला आणि चंद्रावर उतरणार २३ ऑगस्टला

भारतीय खगोलशास्त्रज्ञ अश्विन शेखर यांच्या नावे ओळखला जाणार ग्रह

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडले

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडलेजचा हा पहिला उपग्रह टॅगिंग प्रकल्प आहे. या अभ्यासामुळे पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची हालचाल समजण्यास मदत होईल. गतवर्षी पाच कासवांना उपग्रह टॅग करण्यात आले होते पण ॲागस्ट महिन्यापर्यंत काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे सिग्नल बंद झाले. त्यामुळे त्याची माहिती पुढे समजून घेता आली नाही. यावर्षी दोन कासवांना लावलेले उपग्रह टॅग जास्तीत जास्त माहिती पोहोचवू शकतील, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.

Exit mobile version