इस्रायली सैन्याने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी ज्यू वस्तीवर झालेल्या हल्ल्याचे नेतृत्व करणारा हमास कमांडर अब्द अल-हादी सबा याला ठार केले आहे, अशी माहिती इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) दिली. नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्यात खान युनिसमधील हमासच्या एलिट नुखबा फोर्सचा कमांडर मारला गेला, असे इस्रायली सैन्य आणि शिन बेट यांनी सांगितले. त्याने इस्रायलमधील किबुट्झ नीर ओझवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व केले होते, या हल्ल्यात दहशतवाद्यांनी डझनभर अपहरण करून त्यांची हत्या केली होती, असे लष्कराने सांगितले.
अब्द अल-हादी सबाह हा खान युनिस येथील मानवतावादी क्षेत्रातील आश्रयस्थानातून काम करत असे. ७ ऑक्टोबरच्या हत्याकांडाच्या वेळी किबुत्झ नीर ओझमध्ये घुसखोरी करणाऱ्या नेत्यांपैकी हा एक होता. सबा याने यापूर्वीही असंख्य दहशतवादी हल्ल्यांचे नेतृत्व केले होते, अशी माहिती आयडीएफने ट्विट करत दिली आहे.
हे ही वाचा :
पाकिस्तानमध्ये दहशतवाद विरोधी आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांचा गोळीबार
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० च्या प्रकल्पास गती द्यावी!
मुस्लिमांनी फेकलेले दगड, विटा स्वसंरक्षणार्थ!
इस्रायलच्या शिन बेट सुरक्षा सेवेने मंगळवारी जारी केलेल्या वर्षअखेरीच्या आढाव्यानुसार, हमासचे उपराजकीय प्रमुख आणि गटाच्या लष्करी शाखेचे संस्थापक अरोरी हे गेल्या वर्षभरात लेबनॉनमध्ये मारल्या गेलेल्या किमान पाच हमास नेत्यांपैकी एक होते. पॅलेस्टिनी एन्क्लेव्हच्या आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अंदाजानुसार, ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायलचे लष्करी आक्रमण संपूर्ण गाझा पट्टीवर सुरू आहे, ज्यात किमान ४५,५४१ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि १,०८,३३८ जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात, इस्रायली सैन्याने उत्तर गाझामधील रुग्णालयावर छापा टाकून जाळपोळ केली. लष्कराने सांगितले की त्यांनी २४० संशयित दहशतवाद्यांना अटक केली.