23 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरदेश दुनियाबैल गेला नि झोपा केला

बैल गेला नि झोपा केला

Google News Follow

Related

जो बायडन यांचे वरातीमागून घोडे

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करताना तालिबानकडून अमेरिकेच्या सैन्यावर होणारा हल्ला सहन करणार नसल्याचं सांगत तालिबानला सज्जड दम भरलाय. याशिवाय अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलांवरील हल्ले देखील सहन करणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे आतापर्यंत १८,००० लोकांना सुखरुप बाहेर काढल्याचं सांगताना बायडन यांनी रेस्कू ऑपरेशननंतर संपूर्ण सैन्य अफगाणमधून बाहेर काढू, असंही सांगितलं.

जो बायडन म्हणाले, “पुढील आठवड्यात जी ७ बैठकीत अफगाणिस्तान मुद्यावर चर्चा करणार आहे. अमेरिकेच्या सैन्यावर केलेला हल्ला सहन केला जाणार नाही. तालिबानने अमेरिकेवर हल्ला केला तर त्याला उत्तर देऊ. नाटो देश अमेरिकेबरोबर उभे आहेत. आतापर्यंत १८,००० लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. जेलमधून निघालेले इस्लामिक स्टेटचे दहशतवादी हल्ला करू शकतात. अफगाणिस्तानमध्ये संकट मोठं आहे.”

“शरणार्थी लोकांना सगळी मदत पुरवण्यात येतेय. जे अमेरिकन नागरिक परत येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना परत आणणार आहे. आयएसआयएस दहशतवाद्यांकडून जास्त धोका आहे. आम्ही काबूल एअरपोर्ट पूर्णपणे सुरक्षित केले आहे. अफगाणिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणणार आहे. अफगाणिस्तानमध्ये युद्ध संपवण्याची वेळ आली आहे. महिला आणि मुलांवरचा हल्ला सहन करणार नाही,” अशी भूमिका बायडन यांनी मांडली.

हे ही वाचा:

भारताने बनवली जगातील पहिली डीएनए लस

पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन

लोकप्रतिनिधींच्या दबावाला कंटाळून तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा! ऑडिओ क्लिप व्हायरल

एकट्या मोदींविरोधात विरोधकांची एकता

“अफगाणिस्तानमधून निघण्याचा निर्णय माझा होता. तालिबानसाठी अफगाणिस्तानमध्ये वेळ कठीण आहे. काबूलमधून एअरलिफ्ट करणं सगळ्यात कठीण काम आहे. आम्ही तालिबान बरोबर प्रत्येकवेळी संपर्कात होतो. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचा काही स्वार्थ नाही. चार्टर्ड विमानाने लोकांना एअरलिफ्ट केले जात आहे. १५ वर्षांपूर्वी अफगाणिस्तान सोडू शकत नव्हतो. जेव्हा आमचे रेस्कु ऑपरेशन पूर्ण होईल त्यानंतर आम्ही पूर्णपणे सैन्य परत बोलावू,” असंही बायडन यांनी नमूद केलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा