रशिया युक्रेन युद्धाला आज एक वर्ष पूर्ण 

संपूर्ण जगावर या युद्धाचे  गंभीर परिणाम

रशिया युक्रेन युद्धाला आज एक वर्ष पूर्ण 

‘युक्रेनचा काही दिवसातच पराभव होईल’ असे बरोबर एक वर्षांपूर्वी पुतीन यांनी घोषित केले होते. आज या युद्धाला  वर्ष  असून यात कोणाचाच पराभव नसून एकामागून एक शहरे उध्वस्त झाली आहेत. २४ फेब्रुवारी रोजी २०२२ ला रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. पण आता वर्षभरानंतर पण याला कुठेच पूर्णविरामाचं नाही. हे युद्ध फक्त या दोन देशाचेच नसून याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. या युद्धाच्या आधी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षनी झेलेन्स्की यांनी सुद्धा जनतेला संबोधित केले होते. हजारो संख्येच्या घरात लोक मरण पावली असून कितीतरी निर्वासित झाले आहेत. याचा मुख्य परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

किती सैन्य मारले गेले?

युक्रेनने या युद्धात २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत १,४५,८५० सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रशियाने अधिकृत आकडेवारी जाहीर करत या युद्धात त्यांचे सहा हजार सैनिक मारले गेल्याचे सांगितले आहे. तर रशियाच्या न्युज वेब साईट मॉस्को टाइम्सने दिलेल्या माहिती प्रमाणे १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत रशियाचे १४,७०९ सैनिक मारले गेले आहेत.

हेही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

मुस्लीम सांगा कुणाचे? मतदारांना औरंग्याच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न…

नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासूनच… MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे

या युद्धाचा सर्वात मोठा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. संयुक्त राष्ट्राने २१ फेब्रुवारीला या युद्धात सामान्य नागरिकांना या युद्धात किती नुकसान झाले त्याची आकडेवारी सांगितली होती. याशिवाय संयुक्त राष्ट्राने एकूण युक्रेनमध्ये एका वर्षात ८,००६ नागरिकांचा मृत्यू तर १३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. फक्त एवढेच नाही या युद्धात ४८६ मुलांचा मृत्यू तर, ९५४ मुले हि गंभीर जखमी आहेत.

तर एकूण मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये या ४० टक्के महिला तर तर ६० टक्के पुरुषांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त या युद्धामुळे फक्त या एक वर्षाच्या कालावधीत आठ लाख लोकांनी युक्रेन देश सोडला असून ते युरोपिअन देशांमध्ये निर्वासित म्हणून आपले जीवन जगत आहेत. तर तीन दशलक्ष च्या आसपास लोक हे युक्रेन सोडून रशियात गेले आहेत. तर दीड दशलक्षांहून अधिक लोक हे पोलंड मध्ये गेले असून एक पूर्णांक एक दशलक्ष पेक्षा जास्त लोक जर्मनी मध्ये आश्रयासाठी गेले आहेत.

Exit mobile version