भारताची लसीकरण मोहिम ज्या संकेतस्थळामार्फत हाताळली जात आहे, ते कोविन संकेतस्थळ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जगभरात विविध देशांत लसीकरण मोहिम चालू असताना, देशांतर्गत पातळीवरील लसीकरण मोहिमेच्या सुलभ हाताळणीसाठी जगातील अनेक देशांना भारत या संकेतस्थळाची सुविध उपलब्ध करून देणार आहे. यावेळी कोविन ग्लोबल कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे विचार मांडणार आहेत.
कोविन या संकेतस्थळाच्या वापरासाठी जगातील ५० देशांनी उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये कॅनडा, मेक्सिको, नायजेरिया, पनामा आणि युगांडा इत्यादी देशांचा सहभाग आहे. कोविन व्यासपीठाच्या आधारे जगातील इतर देश त्यांची लसीकरण मोहिम चालवणार आहेत.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार अजून किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट पाहणार?
ठाकरे सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय
या ठरावाने ओबीसींना आरक्षण मिळणार नाही
ठाकरे सरकारला गरीब मुलांची नाही, ‘आपल्या’ मुलांची काळजी
नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीचे (एनएचए) सीईओ डॉ. डी. आर शर्मा सांनी सांगितले की भारत त्याचे लसीकरण हाताळणी करणारे मुक्त व्यासपीठ इतर देशांना देखील देणार आहे. भारत हे व्यासपीठ मोफत उपलब्ध करून देणार आहे. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी या व्यासपीठाची मुक्त प्रत तयार करायला सांगितली होती आणि ज्या देशांना याची गरज आहे, त्यांनी मोफत पुरवण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते होणार आहे. त्यासोबतच या कार्यक्रमात इतरही काही मान्यवर आपले मत व्यक्त करतील असे म्हटले जात आहे. यात परराष्ट्रीय सचिव एच व्ही श्रींगला, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि शर्मा यांचा समावेश देखील आहे. या कार्यक्रमाची सुरूवात आज दुपारी ३ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील अनेक आरोग्य तज्ज्ञांची उपस्थिती देखील असणार आहे. या कॉन्क्लेव्हचा उद्देश जगातील कोविड-१९ विरुद्धच्या लसीकरण मोहिमेतील कोविनबाबातचा भारताचा अनुभव जगासमोर मांडणे हा आहे.