लग्न पाहावे शिकून…पाश्चिमात्यांची भारताकडे धाव

परदेशातील तरुणवर्ग अशा राजेशाही विवाहसोहळ्याचे नियोजन शिकण्यासाठी भारतात येत आहेत

लग्न पाहावे शिकून…पाश्चिमात्यांची भारताकडे धाव

भारतामध्ये विवाहसोहळ्याला खूप महत्त्व दिले जाते. यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळे जण आपला पैसा पणाला लावतात. श्रीमंतांसाठी तर हा विवाहसोहळा राजेशाही सोहळ्यापेक्षा कमी नसतो. या विवाहसोहळ्याची भारतातील उलाढालच वार्षिक १३० अब्ज डॉलर असल्याचे मानले जाते. म्हणूनच या विवाहसोहळ्याचे व्यवस्थापन शिकण्यासाठी अनेक परदेशी भारताकडे धाव घेऊ लागले आहेत. टाइण्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

 

भारतातील श्रीमंतवर्ग विवाहसोहळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करतात. त्यामुळेच परदेशातील तरुणवर्ग अशा राजेशाही विवाहसोहळ्याचे नियोजन शिकण्यासाठी भारतात येत आहेत. सारा, एम्मा आणि मार्था या प्रशिक्षणार्थींनी हे नियोजनाचे धडे गिरवण्यासाठी राजस्थानमध्ये कित्येक आठवडे मुक्काम ठोकला होता. राजेशाही विवाहसोहळ्यासाठी उच्चभ्रू वर्ग राजस्थानला पसंती देऊ लागला आहे. त्यामुळे त्यांनीही जयपूर आणि अन्य शहरांत दोन-तीन महिने मुक्काम ठोकून सजावट, खाद्यपदार्थ, संगीत, पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या भेटी, कपडे, व्यवस्थापन आणि बरेच काही शिकून घेतले. इतकेच नव्हे तर हे सर्व शिकून घेण्यासाठी त्यांनी पैसेही मोजले आहेत. या सर्वांना अप्लव सक्सेना यांनी इंटर्नशिप दिली आहे.

 

हे ही वाचा:

बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी

ऍमेझॉनमध्ये पाण्याचे तापमान वाढले; १००हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

अभिनेता विवेक ऑबेरॉयची केली दीड कोटींची फसवणूक; एकाला अटक

नांदेडमधील ३१ तर छ. संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात १० रुग्णांचा मृत्यू

 

दूतावासांशी संपर्क साधण्यापासून ते विद्यार्थ्यांना वेडिंग प्लॅनर्सच्या संपर्कात आणणे तसेच, त्यांचे अभ्यासक्रम आणि राहण्याची व्यवस्था आयोजित करण्यापर्यंत सर्व काही सक्सेना करतात. फिनलँडमधील सारा हॉयडेनने तिच्या देशात ‘हॉस्पिटॅलिटी, टुरिझम आणि एक्सपिरिअन्स मॅनेजमेंट’ या विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. ती सध्या जयपूरमध्ये एका वेडिंग प्लॅनर कंपनीत काम करते. “आतापर्यंतचा हा एक विलक्षण प्रवास आहे. मी भारतीय वधूचे पोशाख पाहण्यासाठी जयपूरमधील बाजारपेठांना भेट देत आहे. फ्लोरिस्ट आणि डेकोरेटर्सना भेटते आहे. या नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी नियोजित विवाहसोहळ्यांचे बुकिंग अंतिम करण्यासाठी मी हॉस्पिटॅलिटी उद्योगातील लोकांच्या भेटी घेत आहे,” असे सारा सांगते.

 

 

साराचे गुरू अर्शद हुसेन यांनीही तिचे कौतुक केले. ‘ती हिंदीतील काही प्रमुख वाक्ये शिकली आहे – “कब तक हो जायेगा”, “टाइमसे आ जाना”, “शुक्रिया” “बहुत बडिया भाईसाब” “आपको ही करना है सब कुछ” – आणि विक्रेत्यांशी ती बेधडकपणे व्यवहार करते. पाश्चात्य विद्यार्थी जेव्हा एखाद्या बाबीवर असहमत असतात तेव्हा ते तसे बोलतात. बहुतेक भारतीय विद्यार्थी हातचे राखून बोलतात,’ असे हुसेन यांनी सांगितले.

 

या इंटर्नला माफक प्रमाणात मसालेदार जेवण दिले जाते. शिवाय, साराच्या म्हणण्याप्रमाणे, ऑनलाइन खाद्यपदार्थ डिलिव्हरीचा पर्याय नेहमीच खुला असतो. हे पाश्चिमात्य इंटर्न या ‘कोर्स’साठी पैसेही खर्च करतात. “मी सुरुवातीला या प्रशिक्षणासाठी ५०० युरो दिले. मी भाड्याने आणि जेवणासाठी ३५० युरो खर्च करते,’ असे सारा म्हणते, तिला वेडिंग प्लॅनर्सकडून दरमहा रुपये ३५ हजार वाहतूक भत्ता म्हणून मिळतो.

 

 

रंग थीम निवडणे हे साराला सर्वांत मोठे शिक्षण वाटते. मेहंदी समारंभासाठी पिवळा आणि मुख्य कार्यक्रमांसाठी लाल किंवा गुलाबी रंग वापरला जातो हे तिला पक्के माहीत झाले आहे. एम्मा सिप्पोला ही बर्लिनची आहे आणि ‘सांस्कृतिक व्यवस्थापन’ विषयावर इंटर्नशिप केल्यानंतर जर्मनीला रवाना झाली. जर्मनीमध्ये भारतीयांचे मोठे विवाहसोहळे झाले नाहीत तरी अन्य युरोपीय देशांत नक्की होतील आणि अशाप्रकारचे मोठे सोहळे आयोजित करण्यासाठी ती तयार आहे, असे एम्मा सांगते. तर, ब्रिटनमध्ये ‘वेडिंग प्लॅनिंग’चा डिप्लोमा करणारी मार्था डेव्हिड हिने जयपूर आणि राज्याच्या अन्य भागांत सोर्सेस तयार केले आहेत. त्यामुळे ती इथे स्वत:च्या बळावर राजेशाही विवाहसोहळा आयोजित करू शकेल, असा विश्वास तिला वाटतो.

Exit mobile version