चीनमधील झेजियांग येथील एका कंपनीने ‘विवाहबाह्य संबंध प्रतिबंध’ आदेशाची घोषणा केली आहे. जिमू न्यूजच्या वृत्तानुसार, हा इशारा सर्व विवाहित कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. कंपनीने अलीकडेच कर्मचार्यांसाठीच्या नियमावलीत हा नियम जाहीर केला आहे.
‘कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी, कुटुंबाशी एकनिष्ठ राहण्याच्या कॉर्पोरेट संस्कृतीचा पुरस्कार करण्यासाठी आणि पती-पत्नीमधील प्रेम, कुटुंबाचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, सर्व कर्मचारी जे विवाहित आहेत त्यांना विवाहबाह्य संबंध ठेवणे किंवा प्रेयसी ठेवणे, यांसारख्या वाईट वर्तनापासून बंदी आहे,’ असे कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या नियमावलीत नमूद केले आहे.
‘आम्हाला आशा आहे की सर्व कर्मचारी योग्य प्रेम मूल्ये बाळगतील आणि चार ‘नकारां’सह चांगले कर्मचारी होण्याचा प्रयत्न करू शकतील – कोणतेही अवैध संबंध नाही, प्रेयसी नाही, विवाहबाह्य संबंध नाही आणि घटस्फोट नाही,’ असेही कंपनीने म्हटले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला नोकरीवरून काढून टाकले जाईल, असा इशाराही कंपनीने दिला आहे. कंपनीने हे नियम का लागू केले, यामागचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
हे ही वाचा:
सुट्टीवर गेलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मनिषा कायंदे शिवसेनेत जाणार
केरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत
अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली; मोठा अनर्थ टळला !
जर्मनीत सापडली ३ हजार वर्षांपूर्वीची कांस्य तलवार
कंपनीच्या या विवाहबाह्य संबंधावरील बंदीच्या घोषणेवरून येथील सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशा प्रकारे टोकाचा उपाय अवलंबण्याच्या निर्णयावर लोकांमध्येही दोन गट निर्माण झाले आहे. साउथ चायना पोस्टमधील एका अहवालानुसार, चीनमधील सरकारी मालकीच्या तेल कंपनीतील विवाहित वरिष्ठ अधिकाऱ्याने एका परस्त्रीचा हात पकडल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या अधिकाऱ्याला नंतर कंपनीतून काढून टाकण्यात आले होते.