श्वानांच्या मदतीने इस्रायलमधील पीडितांना देणार दिलासा

श्वानांना एखादा व्यक्ती किती तणावात आहे, हेदेखील कळते.

श्वानांच्या मदतीने इस्रायलमधील पीडितांना देणार दिलासा

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक इस्रायली नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यांना अन्न, पाणी आणि निवारा देण्यासाठी इस्रायली सरकारने तेल अवीवमध्ये केंद्रे स्थापन केली आहेत. तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांना श्वानांची मदत मिळते आहे.

 

इस्रायलच्या तेल अवीव शहराने इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षातून आश्रय शोधत दक्षिणेकडून विस्थापित होणाऱ्या लोकांचा ओघ पाहिला आहे. इस्त्रायली सरकारने त्यांच्यासाठी अन्न, पाणी आणि निवारा देण्यासाठी तेल अवीवमध्ये केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रात अनेक श्वानही होते. त्यापैकी अनेकांना आघातग्रस्त व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्याचे, त्यांना दिलासा देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी

महादेव बेटिंग ऍप प्रकरणी सौरभ चंद्राकरच्या निकटवर्तीयाला अटक

आता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य हमासचा ‘क्रूरतेचा चेहरा’

पैसे घेऊन विचारले प्रश्न; खा. मोईत्रा यांच्यावर अदानी समूहाचे आरोप

‘श्वान खरोखरच मैत्रीपूर्ण आणि आधार देणारे असतात. त्यामुळे जेव्हा लोक अशा मानसिक आघाताचा सामना करत आहेत, तेव्हा त्यातून दिलासा देण्यासाठी या श्वानांची सोबत असणे खरोखरच महत्त्वाचे आहे,’ अशी प्रतिक्रिया एकाने दिली. ‘या श्वानांना एखादा व्यक्ती किती तणावात आहे, हेदेखील कळते. त्यामुळे तुम्ही किती चिंताग्रस्त आहात, हे त्यांना समजते,’ असे एका केंद्रात संगीत कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या तोमर यांनी सांगितले. ‘आपण कल्पनाही करू शकत नाही, अशा प्रकारे आमच्यावर हल्ला झाला. ही खूप बिकट परिस्थिती होती. हमास ही आयएस संघटनाच आहे. आम्ही त्यांना चिरडणार आहोत आणि आम्ही जिंकणार आहोत आणि आम्ही एकत्र राहणार आहोत. सर्व परिस्थिती ठीक होईल,’ असे या व्यक्तीने सांगितले.

 

‘आम्ही सकाळी उठलो, तेव्हा आमच्याभोवती मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत होता. आम्हाला हे समजायला थोडा वेळ लागला की, आमच्यावर मोठा हल्ला झाला होता, कदाचित जवळपासच्या भागातून घुसखोरी केलेल्या हजारो दहशतवाद्यांनी केला होता. ते गावोगावी फिरत होते. हत्या बलात्काराची कृत्ये करत होते,’ असे एका विस्थापिताने सांगितले. युद्ध सुरू झाल्यानंतर सुमारे ६० हजार लोक दक्षिण इस्रायलमधून तेल अवीवमध्ये आले आहेत.

Exit mobile version