महाराष्ट्रात १०० कोटींच्या वसुलीची चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे सरकारला पळता भुई थोडी झाली. आता १०० कोटींचे हे नवे टार्गेट समोर आले आहे.
भारतात येत्या ऑक्टोबरपर्यंत १०० कोटींचे लसीकरण होईल, असे वृत्त आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारत १००कोटींचे लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करू शकेल.
शुक्रवारी भारत अडीच कोटींचे लक्ष्य एकाच दिवसात पार करेल असाही विश्वास व्यक्त होत आहे.
मोदी सरकारच्या निर्णयांवर सातत्याने केवळ टीका करणाऱ्यांना आता मोदी सरकारच्या लसोत्सवाबद्दल विश्वास वाटू लागला आहे.
या वृत्तात म्हटले आहे की, केरळ आणि कर्नाटकच्या सीमाभागातही लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत १ कोटी झायडस कॅडिला लस तयार ठेवण्यात येईल. ही जगातील पहिली डीएनए लस असून ती १२ ते १८ वर्षातील मुलांना दिली जाईल.
या महिन्यात सिरम इन्स्टिट्यूटकडून सरकारने २० कोटी कोव्हिशिल्ड लशी मिळतील असे म्हटले आहे. शिवाय, कोव्हॅक्सिनच्या ३.५ कोटी लशीही मिळणार आहेत. फायझर बायोएनटेक लसीही उपलब्ध होतील असे म्हटले जात आहे.
हे ही वाचा:
… म्हणून त्यांनी चोरल्या सव्वादहा लाखांच्या बाईक!
‘शहापूर- खोपोली मार्गाचे काम राज्याकडे सोपवले ही मोठी चूक’
ठाणे, नवी मुंबई वाहतूक पोलिस विभागात क्रेनवर भ्रष्टाचाराचे ओझे
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भारतात आता लसीकरणाचा वेग वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी १७ सप्टेंबरला दिवसभरात दोन कोटींचा टप्पा पूर्ण झालेला आहे. दिवस अखेर लसीकरण अडीच कोटीच्या पार जाईल अशी शक्यता आहे. हा एकप्रकारचा विक्रम आहे. महाराष्ट्रातही लसीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. केंद्राने दिलेल्या लसींच्या जोरावरच महाराष्ट्रानेही विक्रमी लसीकरण केलेले आहे.