जगभरात चर्चेत असणारा ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ फ्रान्स येथे पार पडणार आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा महोत्सवात यंदा मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवार, ६ मे रोजी याबाबत घोषणा केली आहे. ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्णी लागली आहे.
फ्रान्स येथे १७ ते २८ मे दरम्यान कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ असा बहुमान मिळाला आहे. शिवाय असा बहुमान मिळवणारा भारत पहिला देश आहे. त्यामुळे कान्स महोत्सवच्या निमित्ताने भारताला चित्रपट क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे.
मराठी चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय दर्जा वाढविणे, त्यांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, तसेच महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे महत्त्व वाढविणे या उद्देशाने मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होतात.
हे ही वाचा:
‘न्यायालयाने केला ठाकरे सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा पर्दाफाश केला’
… म्हणून कोल्हापूर शहर १०० सेकंद झाले स्तब्ध
आठ दिवसांतून एकदा पाणी; औरंगाबादमध्ये भाजपा-मनसेचे आंदोलन
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिला रुद्राभिषेक
महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत अशोक राणे, सतिश जकातदार, किशोरी शहाणे-विज, धीरज मेश्राम, मनोज कदम, दिलीप ठाकूर आदी तज्ज्ञ सदस्यांची परिक्षण समिती तयार करण्यात आली होती. या समितीने ३२ चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.