बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या ऍथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तीन भालाफेकपटूंनी अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर फेक करत थेट अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर डीपी मनू, किशोर जेना यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला.
हे ही वाचा:
तेलंगणाची ‘सूरही’ ते नागालँडची ‘शाल’, ब्रिक्स परिषदेतील नेत्यांना मोदींकडून भेट !
अजित पवारांना आता पुन्हा संधी नाही!
आयआयटी मुंबईला अज्ञात व्यक्तीकडून १६० कोटींची देणगी
अजित पवार गटाने शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली, ही फूटचं!
ऍथलेटिक्सच्या इतिहासात प्रथमच तीन भारतीय जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. भारतीय भालाफेक प्रकारासाठी हा ऐतिहासिक दिवस ठरला. नीरज चोप्राने त्याआधी जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी आवश्यक असलेली ८३ मीटरची रेषा ८८.७७ मीटर फेक करत सहज ओलांडली. शिवाय, २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्याने प्रवेश निश्चित केला.
डीपी मनूने ८१.३१ मीटर फेक करत सहावे स्थान मिळविले तर जेनाने ब गटातून ८०.५५ मीटर फेक करत नववे स्थान मिळविले. पहिल्या १२ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश मिळणार होता. जेनाची ही पहिलीच जागतिक स्पर्धा आहे.