बांगलादेशच्या चितगावमध्ये तीन हिंदू मंदिरे लक्ष्य!

शेकडो लोकांच्या जमावाने मंदिरांवर विटा आणि दगड फेकले

बांगलादेशच्या चितगावमध्ये तीन हिंदू मंदिरे लक्ष्य!

बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंना आणि हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केले जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. शुक्रवारीही बांगलादेशमधील चितगावमध्ये अशी घटना घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. बांगलादेशातील चितगावमध्ये शुक्रवारी प्रार्थनेनंतर घोषणाबाजी करणाऱ्या जमावाने तीन हिंदू मंदिरांची तोडफोड केली. इस्कॉनचे माजी सदस्य आणि हिंदू संत चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर चितगावमध्ये निदर्शने आणि हिंसाचार झाला आहे.

स्थानिक न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, चितगावच्या हरीश चंद्र मुनसेफ लेनमध्ये असलेल्या हिंदू मंदिरांवर शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास हल्ला झाला. हल्लेखोरांच्या जमावाने शांतनेश्वरी मातृ मंदिर, शोनी मंदिर आणि शांतनेश्वरी कालीबारी मंदिराला लक्ष्य केले. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घोषणाबाजी करत असलेल्या शेकडो लोकांच्या एका गटाने मंदिरांवर विटा आणि दगड फेकले. शोनी मंदिराच्या दरवाजांचे आणि इतर दोन मंदिरांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रमुख अब्दुल करीम यांनी हल्ल्याला दुजोरा दिला असून हल्लेखोरांनी मंदिरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही बाजूंच्या हाणामारीत मंदिरांचे फारसे नुकसान झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही गटांनी एकमेकांवर विटा आणि दगडफेक केली. शांतीनेश्वरी मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य तपन दास यांनी सांगितले की, “शुक्रवाराच्या प्रार्थनेनंतर शेकडो लोकांचा जमाव आला आणि त्यांनी हिंदुविरोधी आणि इस्कॉनविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. जेव्हा परिस्थिती बिघडली तेव्हा आम्ही सैन्याला पाचारण केले त्यानंतर घटनास्थळी सुरक्षा दल येताच त्यांनी सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यात मदत केली. दुपारी सर्व मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात आले होते. पण, जमावाने अचानक हल्ला केल्याने खळबळ उडाली.”

हे हि वाचा:

‘फेंगल’ चक्रीवादळ तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या किनारी भागात धडकणार!

चॅम्पियन्स ट्रॉफीवर तोडगा काढण्यासाठी आयसीसीची बैठक आज!

काँग्रेसमध्ये संघाचे स्वयंसेवक किती?

वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला जीआर रद्द!

बांगलादेशच्या इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा चेतनाचे (इस्कॉन) सदस्य, आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांना २५ नोव्हेंबर रोजी देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. चितगाव न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. चिन्मय कृष्ण दासच्या अटकेविरोधात बांगलादेशची राजधानी ढाका आणि चितगावसह अनेक ठिकाणी हिंदू समुदायाने निदर्शने सुरू केली. ३० ऑक्टोबर रोजी चटगावच्या कोतवाली पोलिस ठाण्यात चिन्मय कृष्ण दास यांच्यासह १८ जणांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चितगावच्या न्यू मार्केट परिसरात हिंदू समुदायाच्या रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

काँग्रेसमध्ये संघाचे स्वयंसेवक किती? | Dinesh Kanji | Nana Patole | Bunty Shelke | Congress | RSS |

Exit mobile version