अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबायची चिन्हं दिसत नसून रविवार, १७ जुलै रोजी अमेरिकेत पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर मारला गेल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलच्या फूड कोर्टमध्ये काल संध्याकाळी एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या अंदाधुंद गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या वेळी काही लोकांनी आरोपीकडून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका नागरिकाने त्याच्याकडील बंदुकीने या हल्लेखोरावर गोळी चालवली आणि यात गोळीबार करणारा हल्लेखोर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
US | Four people, including a gunman, were killed on Sunday evening, July 17, at Greenwood Park Mall in Indiana state in the United States after a man with a rifle opened fire in a food court and an armed civilian shot him, reported AP, citing the police
— ANI (@ANI) July 18, 2022
संबंधित घटनेची माहिती महापौर मार्क डब्ल्यू मायर्स यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसरातील सुरक्षा वाढविली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा:
१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान
इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू
प्रतीक्षा संपली!! नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग ‘या’ तारखेपासून सुसाट
शेलार म्हणाले, ख्वाजा चिस्तीच्या हत्या प्रकरणाची चौकशी करा!
जुलैच्या सुरुवातीलाही इंडियानामध्ये गोळीबाराची घटना घडली होती. इंडियानामधील गॅरी सिटीमध्ये एका पार्टीदरम्यान गोळीबार झाला होता. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.