जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये सध्या जन्मदर वेगाने घटत असून ही घट रोखण्यासाठी तीन अपत्ये धोरणास चीनच्या राष्ट्रीय विधिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. सध्या चीनची लोकसंख्या एक अब्ज ४४ कोटी ४८ लाख ७७ हजार १०८ इतकी आहे. सत्ताधारी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ ने (सीपीसी) तीन अपत्ये धोरण मांडले होते.
चीनच्या ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’च्या स्थायी समितीने शुक्रवारी सुधारित लोकसंख्या आणि कुटुंब नियोजन कायदा संमत केला. या सुधारित कायद्यानुसार, चिनी दाम्पत्यांना कमाल तीन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे. आधीचं दोन अपत्ये जन्माला घालण्याचे धोरण शिथिल केले आहे. जन्मदरात मोठ्या प्रमाणात घट होत आहे, त्यामुळे भविष्यात लोकसंख्येचं संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असताना चीननं हा निर्णय घेतला आहे. आता लोकसंख्या वाढीसाठी हम दो, हमारे तीन धोरण आखताना चीन सरकारनं त्यासाठी भरघोस सवलतीही दिल्या आहेत.
हे ही वाचा:
भारताने बनवली जगातील पहिली डीएनए लस
पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन
लोकप्रतिनिधींच्या दबावाला कंटाळून तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा! ऑडिओ क्लिप व्हायरल
एकट्या मोदींविरोधात विरोधकांची एकता
चीननं लोकसंख्या वाढीचा दर कमी झाल्यानं वाढलेल्या चिंतांमुळेच चीन सरकारनं लोकसंख्या नियंत्रणासाठी अनेक दशकांपूर्वी तयार केलेली ‘वन चाइल्ड पॉलिसी’ २०१६ मध्ये संपुष्टात आणली होती. त्यानंतर चीनने जोडप्यांनी दोन मुले जन्माला घालण्याचे धोरण स्वीकारले होते. आता पाच वर्षांत पुन्हा धोरण बदलून तीन अपत्ये जन्माला घालण्याचे धोरण चीनने स्वीकारले आहे.