भारत,चीन,इराण दूतावासांवर हल्ला करण्याची धमकी

संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालामध्ये माहिती आली समोर

भारत,चीन,इराण दूतावासांवर हल्ला करण्याची धमकी

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता असून चीन, भारत आणि इराणचे दूतावास तेथे सक्रिय आहेत. अशा स्थितीत इस्लामिक स्टेट इन इराक अँड लेव्हेंट-खोरासान  दहशतवादी संघटनेने दूतावासांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. आशियातील अफगाणिस्तानमधील भारतासह चीन आणि इराणच्या दूतावासांवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे.

या संघटनेचे भारत, चीन आणि इराण दूतावासांना लक्ष्य करून अफगाण, तालिबान, आणि मध्य तसेच दक्षिण आशियायी क्षेत्रातील संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांमधील संबंध कमकुवत करणे हा या मागे उद्देश आहे.  त्यामुळेच या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमधील चीन, भारत आणि इराणच्या दूतावासांवर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली असल्याचे अहवालात नमूद करण्यात

ही धमकी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात म्हटले आहे. ही दहशतवादी संघटना विविध राजनैतिक मोहिमांना लक्ष्य करत असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अहवालात म्हटले आहे. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारताने आपल्या अधिकाऱ्यांना मोहिमेतून माघारी बोलावले होते. त्यानंतर दहा महिन्यांनंतर, गेल्या वर्षी जूनमध्ये भारताने काबूलमधील दूतावासात एक तांत्रिक पथक पाठवले होते.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

‘दहशतवादी कृत्यांचा आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षेला असलेला धोका’ यावर सुरक्षा परिषद लवकरच बैठक घेणार आहे.काबूलमधील रशियन दूतावासावर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हल्ला झाला होता, जो तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतरचा पहिला हल्ला होता. डिसेंबरमध्ये पाकिस्तानी दूतावास आणि चिनी नागरिकांच्या हॉटेलवर हल्ले केल्याचा दावा केला होता.

Exit mobile version