तालिबानचे हजारो दहशतवादी हे लवकरच पंजशीर खोऱ्यात लढायला जाणार असल्याची माहिती तालिबानकडून मिळत आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पंजशीर खोऱ्यातच तालिबानचा विरोध करायला सामान्य जनतेने सुरवात केली आहे. हा भाग ताब्यात घेतल्यास तालिबानचा संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा होऊ शकेल. त्याचबरोबर हा भाग जर तालिबानविरोधी शक्तीचं केंद्र बनला तर तालिबानच्या सत्तेला कायमच धोका राहील.
अफगाणिस्तानमधील पंजशीर खोरे हा देशाचा एकमेव भाग आहे, जो तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तान वेगाने तालिबानच्या नियंत्रणाखाली आला, पण तालिबानी दहशतवाद्यांनाना पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आलेला नाही. तसेच पंजशीर खोऱ्यातून तालिबानला आव्हान दिले जात आहे. हेच कारण आहे की, तालिबानलाही पंजशीर खोऱ्याबद्दल चिंता वाटू लागलीय आणि त्यांनीसुद्धा बंदुकीचा भाषा करायला सुरुवात केलीय. आम्ही ताकदीने किंवा चर्चेद्वारे पंजशीरची समस्या सोडवू, असं तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम म्हणालेत.
काबूलच्या उत्तरेस स्थित पंजशीर घाटी ही तालिबानविरोधी शक्तींचा प्रमुख गड आहे. संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तालिबानने तेथे आक्रमण केले आणि जबरदस्तीने ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तिथले जमलेले सशस्त्र गट योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकतात.
हे ही वाचा:
आता चिंता अफगाणिस्तानातून युरोपात होणाऱ्या स्थलांतराची
मध्य रेल्वे बांधणार १३ पादचारी पूल नव्याने
नक्षलवादाला गाडायाला सज्ज झाल्या ‘दुर्गा’
हिंदुकुश पर्वतरांगांनी वेढलेले पंजशीर खोरे फार पूर्वीपासून तालिबानविरोधी शक्तींचे केंद्र आहे. अफगाण नेता अहमद शाह मसूदने सोव्हिएत-अफगाण युद्ध आणि तालिबानशी युद्धादरम्यान २००१ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत पंजशीर खोऱ्याचे संरक्षण केले. यामुळेच येथील लोकांनी पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतली आहेत.