अरुणाचल प्रदेशमधील कामेंग नदीचे पाणी काळे झाल्याने हजारो मासे मरण पावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने झालेल्या माशांच्या मृत्यूमुळे स्थानिक प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणाच्या तपासासाठी आता प्रशासनाने तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. इतक्या मोठ्या संख्येने मासे का मेले आणि नदीचे पाणी काळे का झाले, याचा शोध ही टीम घेणार आहे. येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की चीनने कामेंग नदीच्या आजूबाजूचे बांधकाम वाढवले आहे, त्यामुळे नदीचे पाणी काळे होत असून मासे मरत आहेत.
प्राथमिक तपासणीत नदीच्या पाण्याचा टीडीएस वाढल्याचे आढळून आल्याचे जिल्हा मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नदीच्या पाण्याचा रंगही काळा झाला आहे. ते म्हणाले की, टीडीएस वाढल्यामुळे जलचरांसाठी पाण्यातील दृश्यमानता कमी झाली तसेच त्यांना श्वसनाचा त्रास झाला असावा, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तज्ज्ञांच्या मते, नदीतील टीडीएस ६, ८०० मिलीग्राम प्रति लीटर होता.
हे ही वाचा:
१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ!
विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा
भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?
मोदी-पोप बैठकीत काय चर्चा होणार?
जे ३०० ते १,२०० मिलीग्राम प्रति लिटरच्या सामान्य श्रेणीपेक्षा खूप जास्त आहे. पूर्व सियांग जिल्ह्यातील पासीघाट येथील सियांग नदीचे पाणीही नोव्हेंबर २०१७ मध्ये काळे झाले होते. आता कामेंग नदीचे पाणी काळे होण्यामागे चीनचे कारस्थान असल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत. नदीलगतच्या भागात चीनची बांधकामे तीव्र झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे पाण्यातील टीडीएस वाढला आहे.