या वर्षातील पहिले सूर्य ग्रहण कधी जाणून घ्या

नवीन वर्षात किती सूर्यग्रहण आणि किती चंद्रग्रहण होतील हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे.

या वर्षातील पहिले सूर्य ग्रहण कधी जाणून घ्या

सूर्यग्रहण धार्मिकदृष्ट्या ते शुभ मानले जात नाही. तरीपण सूर्यग्रहणाबद्दल सगळ्यांनाच जाणून घेण्याची इच्छा असते असते. अवकाशात घडणारी ही खगोलीय घटना वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे.नवीन वर्षात किती सूर्यग्रहण आणि किती चंद्रग्रहण होतील हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे. नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण लवकरच होणार आहे. त्याची तारीख आणि वेळ काय असेल आणि ते कुठे दिसेल हे जाणून घेऊया.

नवीन वर्षात एकूण ४ ग्रहण होणार आहेत. यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असतील. पहिले ग्रहण एप्रिल महिन्यात होणार आहे. हे सूर्यग्रहण असेल आणि मे महिन्यात चंद्रग्रहण होईल. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही होतील. पंचांगनुसार वर्षातील पहिले ग्रहण गुरुवार २० एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.हे ग्रहण सकाळी ७.४५ पासून सुरू होऊन दुपारी १२.२९ पर्यंत राहील.

पहिले सूर्यग्रण हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल. हे ऑस्ट्रेलिया, पूर्व आणि दक्षिण आशिया, पॅसिफिक महासागर, अंटार्क्टिका आणि हिंदी महासागरातून पाहिले जाऊ शकते. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण देखील भारतातही दिसणार नाही. पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक आणि आर्क्टिकमध्ये पाहिले जाऊ शकते.

हेही वाचा :

सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!

ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून

नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

ज्योतिषशास्त्रानुसार सुतक काळ सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी आणि चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुरू होतो. सुतक काळ हा अशुभ काळ मानला जातो.  सूर्यग्रहणामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या वर्षी होणारी दोन्ही सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीत. त्यामुळे सुतक नसेल. अशा स्थितीत त्याचा कोणत्याही भारतीयावर काहीही परिणाम होणार नाही असे जाणकारांनी म्हटले आहे.

Exit mobile version