तालिबानकडून ‘या’ पत्रकाराला मारहाण

तालिबानकडून ‘या’ पत्रकाराला मारहाण

अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काहीच दिवसात तालिबान्यांनी आपला मूळ रंग दाखवायला सुरुवात केली आहे. देशातील गरीबी आणि बेरोजगारीचे रिपोर्टिंग करणाऱ्या टोलो न्यूजचा पत्रकार झियार खान याद आणि त्याच्या कॅमेरामनला तालिबान्यांनी जबर मारहाण केली आहे. सुरवातीला झियार खान यादच्या हत्येची बातमी पसरली होती. पण हे वृत्त खोटं असल्याचं स्वत: झियार खान यादने स्पष्ट केलं.

टोलो न्यूजचा पत्रकार झियार खान याद हा काबुलमध्ये रिपोर्टिंग करत होता. त्यावेळी काही तालिबानी दहशतवादी त्याच्या जवळ आले आणि त्यांनी झियार खान यादला जबर मारहाण केली. यावेळी झियार खान यादच्या कॅमेरामनलाही मारहाण करण्यात आली. यावेळी झियार खान याद हा अफगाणिस्तानच्या गरिबी आणि बेरोजगारीचे रिपोर्टिंग करत असल्याची माहिती आहे.

सुरुवातीला झियार खान यादच्या मृत्यूची अफवा पसरवली होती. नंतर या वृत्ताचं खंडन त्याने स्वत: केलं. झियार यादने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “मला तालिबान्यांनी मारहाण केली, माझ्या कॅमेरामनलाही मारहाण करत सर्व साहित्याची नासधूस केली. माझा मोबाईलही काढून घेतला. काही जणांकडून माझ्या मृत्यूची अफवा पसरवण्यात आली. तालिबान्यांनी केवळ बंदुकीचा धाक दाखवून मला मारहाण केली.”

हे ही वाचा:

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच टोमॅटोचा चिखल

मालकासकट बाईक उचलणाऱ्या पोलिसाची उचलबांगडी

६ वर्ष अमेरिकेतील तुरुंगात, आता अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री

सीडीएस, जनरल बिपिन रावत यांनी तालिबानला दिला ‘हा’ इशारा

त्यानंतर आणखी एका ट्वीटमध्ये झियार याद म्हणतो की, “मला त्या लोकांनी का मारहाण केली हे माहित नाही. मी तालिबानच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केली आहे. पण अद्याप आरोपींना पकडण्यात आलं नाही आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हाणीकारक आहे.”

Exit mobile version