27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनिया...म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका!

…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका!

Google News Follow

Related

भारताचा शेजारी असलेला देश श्रीलंका सध्या भीषण आर्थिक संकटाला तोंड देत आहे. श्रीलंकेत सध्या अनागोंदी माजली आहे. देश दिवाळखोर झाला आहे. भारताकडून या देशाला शक्य तेवढी मदत केली जात आहे कारण या दोन देशात अगदी जवळचे संबंध आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे भारताच्या नकाशासोबत नेहमी श्रीलंकेचा नकाशा असतो. शाळेत किंवा कॉलेजमध्ये भूगोल शिकताना आपण जे नकाशे वापरतो त्यावरही श्रीलंकेचा नकाशा असतो.

भारताच्या नकाशासोबत श्रीलंकेचा नकाशा का दाखवला जातो?

भारताच्या नकाशामध्ये खालच्या भागात म्हणजे तळाशी अनेकदा श्रीलंकेचा नकाशा दाखवला जातो. हा नकाशा दाखवण्याचं कारण आहे म्हणजे ओशन लॉ. ओशन लॉ म्हणजेच समुद्रासंदर्भातील आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदा. या कायद्याची निर्मिती करण्याचं आणि ते जगभरामध्ये लागू करण्याचं काम संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजेच UN ने केले आहे. हा कायदा बनवण्यासाठी सर्वात आधी १९५६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये ‘यूनायटेड नेशन्स कनव्हेक्शन ऑन द लॉ ऑफ द सी’ या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर १९५८ साली या संमेलनामध्ये झालेल्या चर्चा आणि मतांचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्यात आला. समुद्रामधल्या सीमा आणि निर्बंधांबद्दल जगभरातील देशांचं एकमत असावं या हेतूने हा कायदा बनवण्यात आला होता. त्यानंतर १९८२ मध्ये तीन वेगवेगळ्या संमेलनांचं आयोजन करुन समुद्रातील सीमांसंदर्भातील कायद्यांना मान्यता देण्यात आली. या कायद्यानुसार असं निश्चित करण्यात आलं की किनारपट्टी असणाऱ्या देशांच्या समुद्र किनाऱ्यांपासून त्या देशांची बेस लाइन ही २०० नॉटिकल माइल इतकी असेल. या बेस लाइनच्या आतमध्ये येणारी बेटं आणि भौगोलिक ठिकाणं त्या त्या देशाच्या नकाशामध्ये दाखवणं बंधनकारक करण्यात आले आहे.

एखाद्या देशाला समुद्रकिनारा लाभला असेल तर त्या समुद्रकिनाऱ्यापासून समुद्रामध्ये २०० नॉटिकल माईल अंतरांवरील गोष्ट नकाशात दाखवणं या कायद्यानुसार अनिवार्य आहे. भारताच्या समुद्रकिनाऱ्यांपासून २०० नॉटिकल माईलच्या आतील सर्व भौगोलिक गोष्टी नकाशामध्ये दाखवल्या जातात आणि याच कारणामुळे भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचा नकाशाही दाखवला जातो. भारत आणि श्रीलंकेमधलं अंतर हे २०० नॉटिकल माईलहून कमी आहे. भारताचं शेवटचं टोक असणारं धनुषकोडी हे श्रीलंकेपासून १८ मैलांवर आहे. त्यामुळेच भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका दाखवणं हे महत्वाचं आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला

मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही

महाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला

शिवराज सरकारने टिकवले ओबीसी आरक्षण

एक नॉटिकल माईल म्हणजेच १. ८२४ किलोमीटर या हिशोबाने २०० नॉटिकल माईलचं अंतर हे ३७० किलोमीटर इतकं होतं. म्हणजेच भारतीय समुद्रकिनाऱ्यांपासून ३७० किमी अंतरांवरील सर्व गोष्टी भारताच्या नकाशामध्ये दाखवल्या जातात. त्यामुळेच श्रीलंका एक स्वतंत्र देश असला तरी तो भारताच्या नकाशामध्ये दाखवला जातो. शेजारी देश आहे, देशाशी चांगले संबंध आहेत, भारत मदत करत असतो वगरे असे कोणतेही इतर हेतू यात नाहीत. त्यामुळेच भारताच्या नकाशासोबत श्रीलंकाही दाखवल्याने वाद होत नाही आणि जगभरामध्ये हाच नियम पाळला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा