तुर्कीचे नाव बदलण्याची विनंती संयुक्त राष्ट्र संघाने मान्य केली आहे. त्यामुळे तुर्कस्तानचे (तुर्की) नवीन नाव आता संयुक्त राष्ट्राच्या परवानगीने ‘तुर्किये’ असं करण्यात आलं आहे. तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री मेव्हतुल कावुसोग्लू यांनी संयुक्त राष्ट्राला नाव बदलण्याचे पत्र लिहून विनंती केली होती. त्यानुसार पत्र मिळताच ठराव घेऊन नाव बदलण्यात आले.
तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री मेव्हतुल कावुसोग्लू यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून तुर्कस्तानचे नाव बदलून ‘तुर्किये’ करण्याची विनंती केली होती, अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिली.
तुर्कीत टर्की किंवा तुर्की हे शब्द नकारात्मक मानले जातात. त्यामुळे येथील नागरीक सुरुवातीपासूनच देशाचा उल्लेख तुर्किये म्हणून करत होते. राष्ट्राध्यक्ष एद्रोगान यांनी प्रशासनाला तुर्कीची संस्कृती लक्षात घेवून तुर्कीच्या जागी तुर्कियेचा वापर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनुसार परदेशांत निर्यात करण्यात येणाऱ्या सर्वच उत्पादनांवर ‘मेड इन तुर्की’ ऐवजी ‘मेड इन तुर्किये’चा वापर करण्यात येत होता. तुर्कीच्या सर्वच मंत्रालयांच्या अधिकृत दस्तावेजांवरही तुर्किये लिहिण्यास सुरूवात झाली होती.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमध्ये दोन हल्ल्यांत मजुरासह बँक मॅनेजरचा मृत्यू
साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा
अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार
राष्ट्राध्यक्ष एद्रोगानही बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्कियेला मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते. आता संयुक्त राष्ट्राने मान्यता दिल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.