32 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरदेश दुनियाअश्रफ घनी यांच्यानंतर 'या' महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला

अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला

Google News Follow

Related

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले आहेत. घनी यांनी रविवारी राजधानी काबूलमधून चार कार आणि रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरसह देश सोडला. रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इश्चेन्को यांच्या माहितीनुसार, “चार कार पैशांनी भरलेल्या होत्या, त्यांनी पैशाचा दुसरा भाग हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला, पण सर्व बसवता आले नाही आणि काही पैसे रस्त्यावर पडले होते.”

अश्रफ घनी यांच्यानंतर आता अफगाणिस्तानच्या केंद्रीय बँकेचे प्रमुख अजमल अहमदी यांनीही देशातून पळ काढला आहे. त्यांनी या पलायनासाठी अश्रफ घनी यांना जवाबदार धरले आहे.

तालिबान समर्थकांनी अफगाणिस्तान काबीज केले आहे, त्यानंतर अफगाणिस्तानच्या भविष्यात अस्थिरतेची चिन्हे दिसत आहेत. अशरफ घनी सध्या अज्ञातवासात आहेत. ताजिकिस्तानमध्ये उतरण्यास परवानगी नाकारल्यानंतर घनी यांना घेऊन जाणारे विमान ओमानमध्ये असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. अहवालांनी असेही म्हटले आहे की घनी अमेरिकेत जात आहेत.

अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी फेसबुकच्या एका प्रदीर्घ पोस्टमध्ये, घनी यांनी रविवारी सांगितले की ते रक्तपात टाळण्यासाठी आपण हे करीत आहोत. तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. काबूलमधील फोटोंमध्ये राष्ट्रपती भवनात तालिबान नेते स्पॉट झाले आहेत, जिथे कधी काळी गाझी सरकारचे दैनंदिन कामकाज चालत असे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानच्या मदतीला भारत गेला धावून

तालिबानकडून महिलांना ‘अभय’ दिल्याची घोषणा

अफगाणिस्तानमध्ये विमानातही चेंगराचेंगरी

मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस

देशाच्या पाश्चिमात्य प्रशिक्षित सुरक्षा दलांनी आक्रमक तालिबान समर्थकांपुढे गुडघे टेकले. या महिन्याच्या अखेरीस अमेरिकन सैन्य पूर्णपणे माघार घेण्यापूर्वी या तालिबान समर्थकांनी संपूर्ण देशावर वर्चस्व गाजवले आहे. राजधानीत तणाव आहे, बहुतेक लोक आपल्या घरात लपले आहेत आणि तालिबानी समर्थक मोठ्या चौकात तैनात आहेत. तुरळक लूट आणि सशस्त्र लोकांकडून नागरिकांचे दरवाजे ठोठावल्याच्याही बातम्या आहेत. भयावह शांतता पसरली असून रस्त्यांवर कमी रहदारी दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा