अफगाणिस्तानातील पुजारी म्हणतो मी देश सोडणार नाही… जाणून घ्या का ते..

अफगाणिस्तानातील पुजारी म्हणतो मी देश सोडणार नाही… जाणून घ्या का ते..

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमधून पळ काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती, अश्रफ घनी हे स्वतःच देश सोडून ताजिकिस्तानला पळून गेले आहेत. अशावेळी काबूलमधील रतन नाथ मंदिरातील एक पुजारी मात्र काबुल सोडून जाण्यास नकार देत आहे.

काबूलमधील रतन नाथ मंदिरातील पुजारी राजेश कुमार यांनी अफगाणिस्तान सोडून जायला नकार दिला आहे. “अनेक हिंदूंनी मला काबुल सोडून जाण्यासाठी विनंती केली आहे. माझ्या प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्थाही केली आहे. परंतु मी काबुल सोडून जाणार नाही. माझ्या कुटुंबाने शेकडो वर्ष या देवळात सेवा केली आहे. या मंदिरात जर तालिबानने मला ठार मारलं तर मी ती देवाप्रती माझी सेवा समजेन.” असं राजेश कुमार म्हणाले.

अफगाणिस्तानच्या राजधानीत काबुलमध्ये तालिबानींनी शिरकाव केला आहे. विविध ठिकाणाहून काबुल आपल्या ताब्यात घ्यायला तालिबानने सुरूवात केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान हिंसक कालखंडाच्या उंबरठ्यावर असतानाच, तिथे सत्तांतरही झाले आहे.

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गानी यांनी राजीनामा दिला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शिरकाव केल्यानंतर आता सत्ता ताब्यात घेतल्याची घोषणा करण्याची औपचारिकता शिल्लक असल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गानी यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. तालिबानचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनाकडे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जात असल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात सत्तांतर होणार?

…आणि डॉक्टरच्या खात्यातून गायब झाले पैसे

पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

काबुलमध्ये शिरकाव होत असताना तालिबानकडून निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार, सामान्य अफगाण नागरीक आणि लष्कराविरोधात कोणतीही कारवाई करणार नसल्याचे वचन देत आहोत. तालिबान त्या सगळ्यांना माफ करत असून सर्वांनी घरातच थांबावे आणि कोणीही देश सोडून जाऊ नये अशी धमकी वजा सूचनाही तालिबानने दिली. काबूल शहरात तालिबानी फौजांनी शिरकाव न करण्याची सूचना देण्यात आल्याचे तालिबानने निवदेनात म्हटले.

Exit mobile version