काबूलमधील तालिबानचा लष्करी कमांडर हमदुल्ला मोखलिस, याचा इस्लामिक स्टेट ऑफ खोरासानने केलेल्या हल्ल्यात मारला गेला. हे माहिती तालिबानच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी एएफपीला सांगितले.
मोखलिस हा पाकिस्तानने पोसलेल्या कट्टर हक्कानी नेटवर्कचा सदस्य आणि बद्री कॉर्प्स स्पेशल फोर्समध्ये अधिकारी होता. सूत्रांनी सांगितले की तालिबानने राजधानी ताब्यात घेतल्यापासून मारले गेलेले मोखलिस हे सर्वात ज्येष्ठ तालिबान नेते आहेत.
मंगळवारी, सरदार मोहम्मद दाऊद खान लष्करी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोन स्फोट झाले आणि त्यानंतर जोरदार गोळीबार झाला. तालिबानचे विरोधक, इस्लामिक स्टेट खोरासान या गटाने राजधानीच्या मध्यभागी झालेल्या बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
The #Taliban commander Hamdullah Mukhlis who entered first to Presidential palace @ARG_AFG on 15th August,has been killed today in the attack on military hospital in Kabul
In 2017 in an attacked on the hospital dozens of patients & health workers have been killed pic.twitter.com/qYDYaQ9JxR
— Waheed Faizi (@imWaheedFaizi) November 2, 2021
इस्लामिक स्टेट-खोरासान (आयएस-के) ने आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील एका निवेदनात म्हटले आहे की “पाच इस्लामिक स्टेट गटाच्या सैनिकांनी एकाच वेळी विस्तीर्ण जागेवर समन्वित हल्ले केले”.
तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद म्हणाला, “आयएस बंडखोरांना रुग्णालयातील नागरिक, डॉक्टर आणि रुग्णांना लक्ष्य करायचे होते.” तालिबानी सैन्याने १५ मिनिटांत हा हल्ला परतवून लावल्याचा दावाही त्यांनी केला. तो म्हणाला, अफगाणिस्तानच्या माजी सरकारकडून या गटाने ताब्यात घेतलेल्या एका हेलिकॉप्टरमधून तालिबानच्या “विशेष दलांना” रुग्णालयाच्या छतावर सोडण्यात आले.
हे ही वाचा:
ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक
फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू
स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक
नरक चतुर्दशीला काय करावे? अभ्यंग स्नानाचे महत्व
एका आत्मघातकी हल्लेखोराने रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्फोटकांचा स्फोट केला तेव्हा हा हल्ला झाला. त्यानंतर बंदूकधारी हल्लेखोर गोळीबार करत हॉस्पिटलच्या मैदानात घुसले.