‘या’ देशातल्या विद्यमान राष्ट्रपतींची हत्या

‘या’ देशातल्या विद्यमान राष्ट्रपतींची हत्या

कॅरेबियन देश हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मोसे यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार संशयास्पद आरोपींना सुरक्षा दलांनी ठार केलं असून दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस प्रमुख लिओन चार्ल्स यांनी इतर हल्लेखोरांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती दिली. मोसे यांचं वय ५३ वर्ष होतं. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार हैतीची राजधानी पोर्ट-अऊ-प्रिन्स येथे राष्ट्रपती निवासामध्ये दुपारी १ च्या सुमारास काही अज्ञात बंदूकधारी व्यक्तींनी त्यांची गोळी मारून हत्या केली. राष्ट्रपती जोवेनल मोसे यांच्या पत्नी मार्टिन मोसे यादेखील जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी फ्लोरिडाला हलवले जात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं आहे.

पोलीस प्रमुख चार्ल्स यांनी बुधवारी दूरचित्रवाणीवरून देशाला संबोधन केलं. राष्ट्रपतींना मारणाऱ्या चार हल्लेखोरांना ठार करण्यात आलं असून दोघांना ताब्यात घेतलं असल्याची त्यांनी माहिती दिली. ज्या तीन पोलिसांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. हल्लेखोर राष्ट्रपतींच्या घरातून बाहेर निघाल्यानंतर रस्त्यामध्ये पोलिसांशी त्यांचं चकमक झाली होती.

मोसे २०१७ मध्ये हैती देशाचे राष्ट्रपती बनले होते. सध्या त्यांच्या राजीनाम्यासाठी देशांमध्ये विरोध प्रदर्शन देखील झाली होती. राजकीय अस्थिरता, गटबाजी ,हिंसा प्राकृतिक संकट यामुळे हा देश गरीब देशांच्या यादीमध्ये आहे.

हे ही वाचा:

मस्त! मत्स्य पालनासाठी आता मत्स्य सेतू!

आईची हत्या करून हृदय खाल्ले

अरेरे! पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दिव्यांगाला गमवावे लागले प्राण

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल

देशाचे अंतरिम प्रधानमंत्री क्लॉड जोसेफ यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. जोसेफ यांनी हल्लेखोर परदेशी असून ते इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा जाणणारे होते असं म्हटलं. हैतीची अधिकृत भाषा क्रेओल आणि फ्रेंच आहे. काही माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार हल्लेखोर काळ्या रंगाचे कपडे घालून आले होते आणि अमेरिकी ड्रग एन्फोर्समेंट एजन्सी मधील प्रतिनिधी असल्याचा त्यांनी दावा केला होता. मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Exit mobile version