‘ऑपरेशन गंगा’चे तिसरे विमान भारतात दाखल

‘ऑपरेशन गंगा’चे तिसरे विमान भारतात दाखल

युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणले जात आहे. शनिवारी आणि आज पहाटे असे दोन विमान दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान आता तिसरे विमान विद्यार्थ्यांना घेऊन, बुडापेस्ट हंगेरीमधून भारताकडे रवाना झाले होते ते भारतात दाखल झाले आहे.

भारतीय नागरिकांना घेऊन युक्रेनहून दोन विमाने भारतामध्ये दाखल झाली आहेत. आज तिसरे विमान हंगेरीच्या बुडापेस्ट येथून दिल्लीला येण्यासाठी रवाना झाले होते. या विमानात एकूण २४० भारतीय नागरिक प्रवास करत होते तेही सुखरूप भारतात पोहचले आहेत. आतापर्यंत ४६९ भारतीय युक्रेनहून भारतात दाखल झाले आहेत. या युद्धाने जगाची चिंता वाढवली आहे.

गेल्या तीन दिवसापासून युक्रेन रशिया युद्ध सुरु आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाने युद्ध समाप्तीची घोषणा करून, सैन्या माघारी बोलवावे अशी मागणी युरोपीयन राष्ट्रांकडून करण्यात येत आहे. मात्र युद्ध सुरूच असल्याने आता यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा:

एल्फिन्स्टनचा उड्डाणपूल मराठी माणूस होणार का गुल?

भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक

‘२५ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेत ३ लाख कोटींपेक्षा अधिक भ्रष्टाचार’

‘ऑपरेशन गंगा’चे दुसरे विमान भारतीयांना घेऊन दिल्लीत दाखल

युक्रेनमध्ये एकीकडे युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे आणि देश सोडून पळून जाणाऱ्या लोकांचे फोटो समोर येत आहेत. तर दुसरीकडे युक्रेन संसद सदस्यांपासून ते लहान मुलांपर्यंत शस्त्र हातात घेऊन युद्धात सहभागी होत आहेत, एवढेच नाही तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीही शस्त्र हातात घेऊन युद्धासाठी उतरले आहेत. तसेच युक्रेन आणि रशियाच्या काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. युक्रेनच्या मदतीसाठी मित्र राष्ट्रांनी पुढाकार घेतला आहे. अमेरिकेने ३५ करोडची हत्यारे युक्रेनला दिली आहेत.

Exit mobile version