अमेरिकेतील लक्षाधीश आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेणारे उद्योजक विवेक रामास्वामी यांनी अमेरिकी समालोचक आणि लेखक ॲन कुल्टर यांना पॉडकास्टमध्ये आमंत्रित केले होते. मात्र कुल्टर यांनी ‘विवेक रामास्वामी यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी ती सहमत आहे, परंतु तरीही तिने त्यांना मत दिले नसते, कारण ते ‘भारतीय’ आहेत,’ अशी टिप्पणी केली आहे. त्यांच्या या वंशवादी विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.
रामास्वामी यांचा जन्म भारतीय-अमेरिकन पालकांच्या पोटी झाला. त्यांचे आईवडील केरळमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले. मात्र अमेरिकेत भारतीय नव्हे तर केवळ अमेरिकेत जन्मलेली व्यक्तीच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकते.
जानेवारीत आयोवा कॉकसमध्ये झालेल्या पराभवानंतर रामास्वामी यांनी अध्यक्षपदाची शर्यतीतून माघार घेतली आणि रिपब्लिकन आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याचे वचन दिले. अमेरिकी राजकारणाच्या बाहेरच्या व्यक्ती म्हणून सुरुवात करून, विवेक रामस्वामी यांनी धडक मोहीम राबवून विशेषत: कठोर भाषणे आणि युक्तिवादांमुळे त्यांनी
अमेरिकी नागरिकांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडले आहे.
रामास्वामी यांच्या पॉडकास्ट ‘द ट्रुथ’ वरील ॲन कुल्टर यांच्या टिप्पण्या ऐकून लोकांनी त्या वांशिक पक्षपाती असल्याचे सांगत याची निंदा केली. ‘मला आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. मीसुद्धा तुमची चाहती आहे, म्हणून मी तुमच्याशी असहमत असण्याचा मुद्दा मांडणार आहे म्हणजे मजा येईल. तुम्ही खूप तेजस्वी आणि स्पष्टवक्ते आहात आणि मला वाटते की मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकते कारण तू अमेरिकी कृष्णवर्णीय नाहीस. त्यांच्याबद्दल असे म्हणू शकत नाही, कारण ते अपमानास्पद ठरेल,’ असे कुल्टर म्हणाल्या.
‘तुम्ही अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असताना कदाचित इतर अनेक उमेदवारांपेक्षा तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच गोष्टींशी मी सहमत आहे, पण तरीही मी तुम्हाला मत दिले नसते कारण तुम्ही भारतीय आहात,’ असे त्या म्हणाल्या.
कुल्टर यांनी वंशवादी टिप्पण्या करूनही रामास्वामी यांनी नम्रपणे प्रतिसाद दिला. त्यांनी असे नमूद केले की, त्यांच्या त्वचेचा रंग त्यांच्या देशाबद्दल, अमेरिकेशी त्यांची निष्ठा ठरवत नाही. त्यांनी स्पष्ट केले की स्थलांतरित किंवा त्यांच्या मुलांमध्ये त्यांच्या स्वतःच्या देशाचा द्वेष करणाऱ्या सातव्या पिढीतील अमेरिकनपेक्षा अधिक मजबूत निष्ठा असू शकते. आपल्या विधानावरून वंशवादी रोख येत असल्याचे लक्षात आल्यानंतर कुल्टर यांनी बचावाचा प्रयत्न केला.
‘अमेरिकेची ‘व्हाइट अँग्लो-सॅक्सन प्रोटेस्टंट्स’ (डब्लूएएसपी)ही मूळ राष्ट्रीय ओळख आहे, याचा अर्थ असा नाही की आपण श्रीलंकन, जपानी किंवा भारतीय कोणालाही त्यात घेऊ शकत नाही, परंतु डब्लूएएसपी या केंद्राभोवती राष्ट्राची मूल्ये केंद्रित आहेत,’ असे कल्टर म्हणाल्या.
पॉडकास्टनंतर, रामास्वामी यांनी ‘एक्स’वर कुल्टर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले, मात्र ते त्यांच्या मतांशी असहमत असल्याचे नमूद केले. ‘इतर उमेदवारांपेक्षा तिने माझ्याशी जास्त सहमती दर्शवली असली तरीही तुम्ही भारतीय आहात म्हणून ती मला मत देऊ शकत नाही, असे ॲन कुल्टरने मला स्पष्टपणे सांगितले. मी तिच्याशी असहमत आहे पण तिच्या मनात तिच्या मनात बोलण्याची हिम्मत होती,’ असे रामास्वामी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले.
हे ही वाचा:
‘या’ पाच कारणांमुळे सेन्सेक्स गडगडला
हनी ट्रॅप प्रकरण; ‘सोनल’ बनून आयएसआयने लष्करी ड्रोन डेटा मिळवला
त्या जहाजावरील भारतीय सुटले! इराणने पाच भारतीय खलाशांना सोडले
हिंदू दहशतवादाचे पितृत्व पवारांचेच, ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट!
रामास्वामी यांच्या पोस्टनंतर त्यांचा कमेंट बॉक्स त्यांच्या समर्थनाच्या प्रतिक्रियांनी भरला होता. विवेक यांनी राखलेल्या संयमाचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. ‘आम्ही सर्वजण विवेकला पाठिंबा देतो आणि तुम्हाला उपाध्यक्ष किंवा इतर कोणत्याही पदावर पाहण्याची आशा आहे,’ अशी प्रतिक्रियाही एकाने दिली.