नव्या पोप निवडीच्या कॉन्क्लेव्हमध्ये ‘हे’ चार भारतीय कार्डिनल्स सहभागी होणार; कशी असते प्रक्रिया?

पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी वॅटिकन सिटीमध्ये ८८ व्या वर्षी निधन

नव्या पोप निवडीच्या कॉन्क्लेव्हमध्ये ‘हे’ चार भारतीय कार्डिनल्स सहभागी होणार; कशी असते प्रक्रिया?

पोप फ्रान्सिस यांचे सोमवार, २१ एप्रिल रोजी वॅटिकन सिटीमध्ये ८८ व्या वर्षी निधन झाले. न्युमोनिया झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रविवारी ईस्टर संडेच्या कार्यक्रमात ते दिसले होते. यानंतर सोमवारी वॅटिकन सिटीमधून पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची बातमी देण्यात आली. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

पोप फ्रान्सिस यांचे पवित्र इस्टरच्या दुसऱ्या दिवशीच निधन झाले. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर वॅटिकनमध्ये नऊ दिवसांचा शोक पाळला जात आहे. ही एक प्राचीन रोमन परंपरा आहे. या काळात, पुढील पोपच्या निवडणुकीची तयारी सुरू होईल. भारतासह जगभरातील कार्डिनल्स (चर्चमधील प्रमुख) त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वॅटिकन सिटीमध्ये जमतील आणि त्यानंतर कॅथलिक चर्चच्या नवीन नेत्याची निवड करण्यासाठी बंद दाराआड बैठक (कॉन्क्लेव्ह) आयोजित करण्यात येईल. पोप निवडण्यासाठी होणाऱ्या परिषदेत मतदान करण्यास पात्र असलेल्या १३५ कार्डिनल्सपैकी चार जण भारतातील आहेत. यामध्ये कार्डिनल फिलिप नेरी फेराओ, कार्डिनल बॅसिलिओस क्लीमिस, कार्डिनल अँथनी पूला आणि कार्डिनल जॉर्ज जेकब कुवाकाड यांचा समावेश आहे. भारतामध्ये एकूण सहा कार्डिनल्स आहेत, पण त्यापैकी दोघे ८० वर्षांहून अधिक वयाचे असल्याने त्यांना नवीन पोपच्या निवडीत मतदानाचा अधिकार नाही.

कोणते भारतीय कार्डिनल मतदान करणार?

कार्डिनल फिलिप नेरी फेराओ (Felip Neri Ferrao)

पुढील पोप निवडण्यासाठी मतदान करणाऱ्या भारतीय कार्डिनल्समधील हे सर्वात वयस्कर कार्डिनल आहेत. त्यांचे वय ७२ वर्षे आहे. सामाजिक न्याय आणि हवामान बदल यासाठी कार्य करणारे फेराओ १९७९ मध्ये पाद्री झाले. ४३ वर्षांनी त्यांना कार्डिनलपद बहाल करण्यात आले. ते भारतातील कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स आणि आशियाई बिशप कॉन्फरन्स फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून देखील काम करतात.

कार्डिनल जॉर्ज जेकब कुवाकाड (George Koovakad)

जॉर्ज जेकब कुवाकाड हे भारतातील सर्वात तरूण कार्डिनल आहेत. त्यांचे वय ५१ वर्षे आहे. २००४ मध्ये त्यांना पाद्री म्हणून दीक्षा मिळाली आणि २० वर्षांनी त्यांना कार्डिनल बनवण्यात आले. कुवाकड यांनी २०२१ पासून पोप फ्रान्सिसच्या आंतरराष्ट्रीय भेटींचे समन्वय देखील केले होते.

कार्डिनल अँथनी पूला (Anthony Poola)

भारतातील पहिले दलित कार्डिनल होण्याचा मान अँथनी पूला यांना मिळाला आहे. ते ६३ वर्षांचे असून हैद्राबादचे आहेत. त्यांची कार्डिनल म्हणून नियुक्ती ही जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक क्षण मानला जातो.

कार्डिनल बॅसिलिओस क्लीमिस (Cleemis Baselios)

बासेलिओस यांचे वय ६४ वर्षे असून ते तिरूअनंतपुरमचे मेजर आर्चबिशप आणि सायरो मलंकरी कॅथोलिक चर्चचे मेजर आर्चबिशप-कॅथोलिकोस आहेत. १९८६ मध्ये त्यांनी पाद्री पदाची दीक्षा घेतली आणि २६ वर्षांनी त्यांना कार्डिनल म्हणून बढती मिळाली.

हे ही वाचा : 

हार्वर्ड विद्यापीठाकडून ट्रम्प सरकारविरुद्ध खटला दाखल; कारण काय?

युक्रेन रशिया युद्ध संपणार? द्विपक्षीय चर्चेसह युद्धाविरामासाठी पुतिन तयार

झिशान सिद्दकींना डी कंपनीकडून जीवे मारण्याची धमकी; १० कोटींचीही मागणी

बेंगळुरूत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर युवकाने केला चावीने हल्ला!

कॉन्क्लेव्ह दरम्यान, कार्डिनल्स “मी सर्वोच्च धर्मगुरू म्हणून निवडतो” असे लॅटिन शिलालेख असलेल्या चांदीच्या आणि सोनेरी कलशात आलटून पालटून मतदान करतात. उमेदवाराला दोन तृतीयांश बहुमत मिळेपर्यंत दिवसातून चार वेळा मतदान चालू राहते. निवडणूक प्रक्रिया कमालीच्या गुप्ततेत पार पाडली जाते यासाठी एकदा कार्डिनल्स यांनी सिस्टिन चॅपलमध्ये प्रवेश केला की, नवीन पोप निवडले जाईपर्यंत त्यांना बाहेरील जगाच्या संपर्कापासून दूर ठेवले जाते. जनतेला निकाल हा संकेत देऊन कळवळा जातो. सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून निघणाऱ्या धुराच्या रंगावरून निकाल स्पष्ट केला जातो. काळा धूर असल्यास कोणताही निर्णय न घेतल्याचे समजते. तर, पांढरा धूर हा नवीन पोप निवडल्याचे दर्शवतो.

बिरबलाची खिचडी शिजायला ठेवलीय पानंही घेतलीत ! | Mahesh Vichare | Raj Thackeray | Uddhav Thackeray |

Exit mobile version