‘भारतात भेदभावासाठी जागा नाही’

अमेरिकी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नावर पंतप्रधान मोंदींचे उत्तर

‘भारतात भेदभावासाठी जागा नाही’

‘जात, पंथ किंवा धर्माच्या आधारावरील भेदभावास भारतात जागा नाही,’ अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी प्रसारमाध्यमांसमोर केली. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांच्या अधिकारांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार उचलत असलेल्या पावलांबद्दल एका अमेरिकन पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान ‘लोकशाही आमच्या नसानसांमधून वाहते,’ असेही पंतप्रधान म्हणाले.

‘आम्ही लोकशाही आहोत… भारत आणि अमेरिका या दोघांच्याही डीएनएमध्ये लोकशाही आहे. लोकशाही आपल्या आत्म्यात आहे आणि आपण ती जगतो आणि ती आपल्या राज्यघटनेत लिहिली आहे. जात, पंथ किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यास येथे जागा नाही,’ असे पंतप्रधान मोदी भारतातील वांशिक अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल म्हणाले.

भारतातील अल्पसंख्याकांच्या अधिकारांमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यास तुमचे सरकार इच्छुक आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा मोदी यांनी ‘भारताचा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रार्थना यावर विश्वास आहे आणि त्याच वाटेवरूनच आम्ही चालतो. म्हणून, जेव्हा लोक असे म्हणतात की अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभाव होतो आहे, तेव्हा मला खरोखर आश्चर्य वाटते. भारत ही खरी लोकशाही आहे. लोकशाहीत भेदभावाला जागा नसते आणि भारत सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो, ’ असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

हे ही वाचा:

‘टायटन’ पाणबुडीवरील ते पाचजण ‘खरे शोधक’ होते

बेपत्ता टायटन पाणबुडीतील ‘त्या’ पाच जणांचा मृत्यू

‘कॅस्ट्रोफिक इम्पोशन’मुळे पाणबुडीचा अपघात

पाटण्यात १५ पक्ष एकत्र येणार

‘जेव्हा तुम्ही लोकशाही म्हणता आणि लोकशाही स्वीकारता तेव्हा भेदभावाला जागा नसते. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर भारताचा विश्वास आहे. जात, पंथ, वय किंवा भौगोलिक स्थानावर आधारित कोणताही भेदभाव न करता सरकारचे फायदे सर्वांसाठी उपलब्ध आहेत,’ यावर त्यांनी जोर दिला.

Exit mobile version