जस्टीन ट्रुडो अखेर झुकले; भारताविरोधात केवळ गुप्तचर यंत्रणांची माहिती, ठोस पुरावा नाही

कॅनडाच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर माहिती देताना जस्टिन ट्रुडो यांनी केला दावा

जस्टीन ट्रुडो अखेर झुकले; भारताविरोधात केवळ गुप्तचर यंत्रणांची माहिती, ठोस पुरावा नाही

गेल्या वर्षभरापासून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडले असून कॅनडाकडून वारंवार खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात कॅनडाने ठोस पुरावा द्यावा, अशी ठाम भूमिका भारताने मांडली असून कॅनडाने आतापर्यंत एकही पुरावा दाखवलेला नाही. यानंतर आता थेट कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीच भारताविरोधात पुरावे नसल्याची कबुली दिली आहे.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर हत्या प्रकरणातील भारताच्या सहभागाबाबतचे आरोप फक्त गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्याचं कबूल केलं आहे. “मला हे सांगण्यात आलं होतं की कॅनडामधून आणि आमच्या इतर पाच मित्र देशांमधून आलेल्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे. एका कॅनेडियन नागरिकाची कॅनडाच्या भूमीवर हत्या करण्याच्या कटात भारत सरकारच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही भारत सरकारशी याबाबत संवाद साधला. भारत सरकारनं आमच्याकडे पुरावे मागितले. त्यावर आम्ही ‘पुरावे तर तुमच्या सुरक्षा यंत्रणेमध्येच आहेत’, असं उत्तर दिलं. पण भारत सरकार पुरावे सादर करण्याबाबत ठाम होतं. पण तेव्हा आमच्याकडे सबळ पुरावा नव्हता, तर फक्त गुप्तचर यंत्रणेकडून आलेली माहिती होती. त्यामुळे आम्ही भारताला सांगितलं की आपण एकत्र मिळून तुमच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊ, कदाचित आपल्याला तिथे पुरावे सापडतील,” असं जस्टिन ट्रुडो यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा : 

न्या. संजीव खन्ना होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

बाबा सिद्दिकी हत्या: मुख्य संशयित शुभम लोणकर विरोधात लुक आउट सर्क्युलर जारी

न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन् हातात तलवारीच्या जागी संविधान

विमानांना वारंवार मिळणाऱ्या धमक्यांचा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून निषेध

कॅनडाच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर सविस्तर माहिती देताना जस्टिन ट्रुडो यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेत केलेला दावा हा कोणत्याही पुराव्याशिवायच असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतानं जस्टिन ट्रुडो यांच्या या कबुलीचा निषेध करताना आम्ही सुरुवातीपासून जे सांगत होतो, तेच खरं ठरलं, असं म्हटलं आहे.

Exit mobile version