अमेरिकेने इराणला काय दिला आहे इशारा?

अमेरिकेने इराणला काय दिला आहे इशारा?

Israeli Foreign Minister Yair Lapid, left, accompanied by Secretary of State Antony Blinken, right, speaks at a joint news conference at the State Department in Washington, Wednesday, Oct. 13, 2021. (AP Photo/Andrew Harnik, Pool)

२०१५ सालचा अणुकरार टिकवण्यासाठी इराण वाटाघाटीच्या टेबलवर परतला नाही तर बळाचा वापर केला जाऊ शकतो. असे संकेत अमेरिकेचे उच्च मुत्सद्दी अँथनी ब्लिन्केन यांनी दिले आहेत. युरेनियम समृद्ध करून कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप इराणवर केला जात आहे. अमेरिका आणि इस्रायलने बुधवारी सांगितले की तेहरान (इराणची राजधानी) जर ऐतिहासिक आण्विक कराराच्या वाटाघाटी करण्यासाठी प्रामाणिकपणे परत आला नाही तर ते इराणशी व्यवहार करण्याचे आणखी संभाव्य मार्ग शोधतील.

इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर बोलताना, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन म्हणाले की, “जर इराणने करारनाम्याचे पुन्हा पालन करण्याची ऑफर नाकारली तर “इतर पर्याय” उपलब्ध आहेत.”

“इराणने निर्माण केलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्ही प्रत्येक पर्यायाचा विचार करू. आम्हाला विश्वास आहे की मुत्सद्देगिरी हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. परंतु मुत्सद्देगिरीसाठी दोन पक्ष लागतात, आणि इराणकडून आम्ही या क्षणी तसं करण्याची तयारी पाहिलेली नाही.” असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

बापरे! कोणी केली धनुष्यबाण घेऊन हत्या?

तालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रौत्सव

‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’

संभाव्य गैर-मुत्सद्दी पर्यायांमध्ये लष्करी बळाचा समावेश असू शकतो, परंतु इराणविरुद्ध निर्बंध किंवा गुप्त कारवाया आणखी कडक करणे हेही पर्याय आहेत.  “असे काही प्रसंग आहेत जेव्हा राष्ट्रांनी जगाला वाईटापासून वाचवण्यासाठी शक्तीचा वापर केला पाहिजे.” इस्रायल कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारे वागण्याचा अधिकार राखून ठेवतो. हा फक्त आमचा अधिकार नाही तर ती आपली जबाबदारी देखील आहे.” असं इस्रायलचे परराष्ट्र मंत्री याईर लापिद म्हणाले.

Exit mobile version