… तर माझ्या डोक्यात दोन गोळ्या झाडा

… तर माझ्या डोक्यात दोन गोळ्या झाडा

अफगाणिस्तानमध्ये अजून शेवटचा बुरुज ढासाळायचा राहिलाय. पंजशीरवर ताबा मिळवण्यात तालिबानला अजूनही यश आलेलं नाही आणि लढाई अंतिम टप्यात असल्याचं दिसतंय. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह हे अजूनही पंजशीरमध्ये खिंड लढवतायत. ते पंजशीरमध्येच आहेत आणि तालिबानविरोधी जो गट आहे एनआरएफ त्याचं नेतृत्व करतायत. कुठल्याच स्थितीत तालिबानसमोर सरेंडर करणार नसल्याची घोषणा सालेह यांनी केलीय.

सालेह यांना तालिबाननं आधी नव्या सरकारमध्ये सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न केले पण ना अल कायदा, ना पाकिस्तान ना तालिबान सालेह यांना राजी करु शकलं नाही. उलट सालेह यांनी राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून गेल्यानंतर स्वत:ला राष्ट्रपती घोषीत केलंय. राष्ट्रपतीचं निधन किंवा तो उपलब्ध नसेल तर उपराष्ट्रपती हाच अफगाणिस्तानचा राष्ट्रपती होतो, त्याच नियमानुसार सालेह यांनी राष्ट्रपती असल्याचं घोषीत केलंय. ह्या दरम्यान तालिबानसोबत लढताना जखमी झालो तर डोक्यात दोन वेळा गोळी घाल असे आदेशच सालेह यांनी स्वत:च्या गार्डला दिल्याचं समजतं.

ब्रिटनचं नामांकित वर्तमानपत्र आहे डेली मेल. त्यात अमरुल्लाह सालेह यांनी एक लेख लिहिलाय. ज्यादिवशी म्हणजेच १५ ऑगस्टला तालिबाननं ताबा घेतला, त्यादिवशी काबूलमध्ये नेमकं काय झालं यावर लेखात प्रकाश टाकण्यात आलाय. सालेह यांच्या दाव्यानुसार- तालिबान काबूलमध्ये पोहोचताच त्यांना काबूलच्या पोलीस प्रमुखांनी फोन केला. जेलमधले तालिबानी कैदी हे बंड करतायत आणि ते पळून जाण्याची तयारी करत असल्याचं पोलीस प्रमुखानं सालेह यांना सांगितलं. त्यावेळेस सालेह यांनी पोलीस प्रमुखांना गैर तालिबानी कैद्यांचं नेटवर्क तयार करुन तालिबान्यांचा विरोध मोडीत काढायला सांगितलं. सालेह यांनी लेखात असही म्हटलंय की, १५ ऑगस्टच्या सकाळी सालेह यांनी संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह खान मोहम्मदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांना फोन केला पण त्यांच्याकडून कुठलही उत्तर मिळालं नाही. ते कमांडोजची तैनाती करण्यात अपयशी ठरले.

हे ही वाचा:

वाट लावणाऱ्या तालिबानला सत्तेसाठी पाहावी लागणार वाट!

‘जनआर्शीवाद यात्रेने विरोधकांचे धाबे दणाणले’

किती मासे गळाला लागले त्याची होणार आता अशी मोजदाद

कुटुंबाला मिळाली अपघाताची नुकसान भरपाई तब्बल पाच वर्षांनी!

तालिबाननं काबूलचा कब्जा घेतल्यानंतर मी अहमद मसूद यांना फोन लावल्याचं सालेह यांनी लिहिलंय. फोन करुन मी त्यांना विचारलं की, भाई तुम्ही कुठे आहात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की, काबूलमध्येच आहे आणि पुढची योजना आखतोय. त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की, मलाही तुमच्या फोर्सेससोबत जोडून घ्या. त्यानंतर सालेह हे स्वत:च्या घरी गेले. पत्नी आणि मुलींना सोबत घेतलं. आणि घरातून बाहेर पडण्यापुर्वी सालेह यांनी पत्नी, मुलींचे फोटो नष्ट केले. सालेह यांनी, काबूल सोडण्यापुर्वी घरातले कॉम्प्युटर वगैरेही नष्ट केल्याचं सांगितलं

Exit mobile version