24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाकराची विद्यापीठात स्फोट करणारी महिला दोन मुलांची आई

कराची विद्यापीठात स्फोट करणारी महिला दोन मुलांची आई

Google News Follow

Related

पाकिस्तानमधील कराची विद्यापीठात स्फोट झाल्याची घटना मंगळवार, २६ एप्रिल रोजी घडली आहे. हा बॉम्बस्फोट एका महिलेने घडवून आणला आहे. या स्फोटात तीन चिनी अधिकाऱ्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.

आत्मघाती बॉम्बस्फोटाचा हल्ला शरी बलोच नावाच्या तीस वर्षीय महिलेने घडवून आणल्याचे समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये हिजाब घातलेला शरी व्हॅनची वाट पाहत आहे. जशी व्हॅन समोर आली त्यांनतर लगेच तिने स्फोट घडवण्यासाठी ट्रिगर दाबताना व्हिडिओमध्ये दिसले आहे. ह्या व्हॅनमध्ये चिनी नागरिक होते अशी माहिती समोर येत आहे.

बलूच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडने कराचीमध्ये मंगळवारी झालेल्या हल्ल्यात चिनी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात चीनचे तीन अधिकारी हुआंग गुइपिंग, डिंग मुफांग आणि चेन साई यांचा मृत्यू झाला, तर वांग युकिंग आणि त्यांचे सुरक्षा रक्षक जखमी झाले, असे बंडखोर गटाने एका निवेदनात म्हटले आहे.

कराची विद्यापीठात हल्ला करणारी ही शरी बलोच, तिला ​​बरामश नावाने देखील ओळखले जाते. पत्रकार गौरव सावंत यांच्या म्हणण्यानुसार, शरी बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) मजीद ब्रिगेडशी संबंधित होती. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या चिनी नागरिकांवर हल्ला करण्यासाठी बीएलएची विशेष शाखा तयार करण्यात आली होती.

शरीने प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि अल्लामा इक्बाल मुक्त विद्यापीठातून एमफिल पदवी घेतली असून ती प्राथमिक शाळेतील शिक्षिका होती. ती बलुचिस्तानच्या तुर्बतमधील नियाझर आबाद येथील रहिवासी होती. तिचा पती डॉक्टर असून तिला दोन मुले आहेत. तिच्या पतीने तिने केलेल्या कृत्याबद्दल अभिमान वाटतं असल्याचे ट्विट केले आहे.

हे ही वाचा:

प्रशांत किशोर यांना अहमद पटेल व्हायचं होतं…

मराठा विद्यार्थ्यांच्या मंत्रालयात गराडा

“जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर आता आकारत असलेला अतिरिक्त कर परत करणार का?”

“कुख्यात युसुफ लकडावाला प्रकरणी पवारांची चौकशी होणार काय?”

शरी बलोच 2 वर्षांपूर्वी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडमध्ये सामील झाली होती. बंडखोरांनी सोडण्याचा पर्याय दिला असतानाही तिने बीएलएने मधून बाहेर पडण्यास तिने नकार दिला होता. बीएलएने माहिती दिली की, शरी बलोचने सहा महिन्यांपूर्वी ‘आत्मत्यागी हल्ला’ करण्याच्या तिच्या निर्णयाची पुष्टी केली होती. बंडखोर गटाच्या प्रवक्त्यानुसार, बलुचिस्तान प्रांतात चीनची उपस्थिती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यासाठी हा आत्मघाती बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा