इराणमध्ये हिजाब विरोधात आंदोलन सुरूच असून या चळवळीच वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला आता अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इराणमधील महिला अधिकार विषयक पत्रकार निलोफर हमिदी यांना अटक करण्यात आली आहे. महसा अमिनी या तरुणीचे वृत्त सर्वात प्रथम निलोफर यांनी जनतेसमोर आणले होते.
महसा अमिनी या इराणी तरुणीचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला. हिजाब व्यवस्थित परिधान न केल्यामुळे या तरुणीला अटक करण्यात आली होती. तीन दिवस पोलीस कोठडीत असलेल्या महसा अमिनीला गंभीर जखमी अवस्थेत तेहरान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी महसाचे आईवडील आणि भाऊ एकमेकांना बिलगुन रडत असतानाचा फोटो पत्रकार निलोफर यांनी काढला. पुढे या फोटोमुळे इराणमधील परिस्थिती जगासमोर आली. पुढे इराणमधील हिजाब विरोधी चळवळीला सुरुवात झाली.
मात्र, या फोटोमुळे पत्रकार निलोफर हमिदी यांना आता अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सुटकेची मागणी जगभरातून केली जात आहे. निलोफर हमिदी यांनी महसाच्या कुटुंबियांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. यानंतर काही दिवसांनी पत्रकार निलोफर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव
भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियांणींनी का केली आत्महत्या?
अनिल देशमुखांचा मुक्काम १ नोव्हेंबरपर्यंत तुरुंगातच
इराणमधील हिजाब विरोधी चळवळीचं वार्तांकन करणाऱ्या अनेक पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सुमारे २८ पत्रकार सध्या अटकेत आहेत. महसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमधील महिला पेटून उठल्या आहेत. महिलांनी ठिकठिकाणी हिजाबविरोधी आंदोलनं करण्यास सुरुवात केली आहे. महिलांनी केस कापत आणि हिजाब जाळत सरकारचा निषेध केला आहे.