भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताना प्रचार कामांनीही वेग पकडला आहे. नेत्यांच्या मुलाखती, सभा सातत्याने सुरू आहेत. अशातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका मुलाखतीत अमेरिकेबद्दल मांडलेलं स्पष्ट मत चीनच्या पचनी पडल्याचे दिसत आहे. नेपाळमधील चीनचे राजदूत चेन साँग यांनी थेट एस जयशंकर यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ थेट शेअर केला आहे.
नेपाळमधील चीनचे राजदूत चेन साँग यांनी एक व्हिडिओ ट्विट करून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे कौतुक केले आहे. “हा एक अतिशय मजबूत संदेश आहे,” असे चेन साँग यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये एस जयशंकर यांनी अमेरिकेबद्दल परखड मत व्यक्त केले आहे. “शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर सुरू झालेले अमेरिकेचे वर्चस्व प्रभावीपणे संपुष्टात आले आहे,” असं जयशंकर म्हणाले. त्यामुळेच जयशंकर यांचे हे विधान चीनला भावल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा:
‘पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्यांनी तिकडं जा, भीक मागून खा’
जपानला मागे टाकून भारत होणार चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था
पाकिस्तानच्या लष्करी बजेटपेक्षा, भारताची स्मार्टफोनची निर्यात जास्त
सुरक्षा दलाकडून गडचिरोलीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
जयशंकर यांनी मुलाखतीत असेही सांगितले की, “युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, गाझामध्ये संघर्षाची परिस्थिती आहे, लाल समुद्र आणि अरबी समुद्रात हल्ले होत आहेत, दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात तणावाची परिस्थिती आहे. अमेरिकेत दहशतवाद आहे, वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत समस्या आहेत, परंतु इतर देशांचेही चीनसोबत स्वतःचे प्रश्न आहेत. या सगळ्यासोबतच अमेरिकेचा प्रभावही कमी होत आहे,” असे ते म्हणाले.