27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियाइस्त्रायल- पॅलेस्टिन संघर्षामध्ये अमेरिका इस्रायलच्या बाजूने मैदानात

इस्त्रायल- पॅलेस्टिन संघर्षामध्ये अमेरिका इस्रायलच्या बाजूने मैदानात

युद्धनौका, लढाऊ विमाने इस्त्रायलच्या जवळच्या प्रदेशात तैनात करण्याचा निर्णय

Google News Follow

Related

इस्त्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये युद्धाचा भडका उडाला असून दोन्ही गटांमध्ये हिंसक संघर्ष सुरु आहे. हमास दहशतवाद्यांच्याच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. अशातच अमेरिकेने या संघर्षात इस्रायलच्या बाजूने संघर्षात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिका इस्त्रायलच्या पाठिशी भक्कमपणे राहिला असून अमेरिकी सरकारने याआधीच इस्त्रायलला आर्थिक मदत जाहीर केली होती. तर, आता बायडेन सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून युद्धनौका आणि लढाऊ विमाने इस्त्रायलच्या जवळच्या प्रदेशात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हमासच्या दहशतवाद्यांकडून इस्रायलवर रॉकेट्सने हल्ले करण्यात आले असून इस्रायलनेही आता प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. हमासच्या दहशतवाद्यांकडून इस्रायली भूमीवर सामान्य नागरिकांवर अत्याचार केले जात असताना दुसरीकडे इस्रायलने गाझा पट्टीत हल्ले करून हमासचा तळ उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय आता अमेरिकन युद्धनौका युद्धभूमीच्या दिशेने सरकू लागल्या आहेत. त्यामुळे आता हे युद्ध निर्णायक वळणावर आल्याचे बोलले जात आहे.

बायडेन सरकारने युद्धनौका आणि लढाऊ विमाने इस्त्रायलच्या जवळच्या प्रदेशात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या मदतीमुळे इस्त्रायलचे बळ वाढणार आहे. संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धनौका इस्त्रायलच्या पूर्व मेडेटेरियन जवळ तैनात केली जाणार आहे. यावर लढाऊ विमाने असणार आहेत. तसेच मिसाईल डागता येणारी यंत्रणाही यावर आहे. याशिवाय अमेरिकेच्या एअरफोर्समधील F-35, F-15, F-16, आणि A-10 लढाऊ विमाने इस्त्रायल जवळच्या प्रदेशात तैनात करण्यात येणार आहेत.

शनिवारी सकाळच्या सुमारास हमासच्या दहशतवादी गटाने इस्त्रायलवर हल्ला सुरु केला. अनेक रॉकेट इस्त्रायलवर डागण्यात आले. त्यानंतर इस्त्रायलने देखील प्रतिहल्ला केला. या संघर्षात दोन्ही बाजूचे १ हजार १०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

हमास दहशतवाद्यांच्याच्या नौदल कमांडरला इस्त्रायल सैन्याने घेतले ताब्यात

तेलंगणामध्ये मृतावस्थेत आढळली १०० माकडे!

जर श्री रामजन्मभूमी परत घेता आली तर आम्ही ‘सिंधूही’ परत आणू!

दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच

दरम्यान, रविवारी अमेरिकेचे संरक्षणविषयक सचिव अँटनी ब्लिंकन यांनी अमेरिका इस्रायलकडून आलेल्या अतिरिक्त लष्करी मदतीसाठीच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करत असल्याचं म्हटलं होतं. त्यापाठोपाठ आता अमेरिकेच्या युद्धनौका इस्रायलच्या किनाऱ्याच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकीकडे इस्रायली लष्कर, हवाई दलाकडून गाझा पट्टीत तुफान बॉम्बफेक केली जात असताना दुसरीकडे भूमध्य सागरातून अमेरिकेच्या युद्धनौका गाझा पट्टीवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा