पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात रॉकेटला गती

ब्रिटिश प्रसारमाध्यमांकडून कौतुक

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात रॉकेटला गती

ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारताच्या विकासाचे कौतुक केले आहे. ‘पंतप्रधान मोदी यांच्या स्थिर सरकारमुळे भारतातील कायदा, मूलभूत कल्याण योजना आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली,’ अशा शब्दांत ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

‘विवादास्पद असे राजकारण असूनही भारताने भौगोलिकतेचा फायदा घेऊन तसेच, डिजिटल कौशल्य आत्मसात करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भारतापुढे चांगल्या संधी असल्या तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हानेही आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठे लक्ष्य समोर ठेवले आहे आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे,’ असे या लेखात ब्रिटिश लेखक बेन राइट यांनी नमूद केले आहे. त्यांनी या लेखात चांद्रयान-३च्या यशाचाही उल्लेख केला आहे. एअर इंडियाकडून लवकरच एअरबस आणि बोइंगकडून विक्रमी ४७० विमानांची खरेदी होणार आहे, याचाही आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

मुंबई आणि दिल्लीतील ऍपलच्या दुकानाचे उद्‌घाटन करण्यासाठी स्वत: ऍपलचे प्रमुख टीम कुक आले होते, तसेच, ऍपलसाठी आयफोन बनवणारी तैवान कंपनी फॉक्सकॉमकडून कर्नाटकमध्ये एक अब्ज डॉलर गुंतवणूक होऊन कारखाना सुरू होणार आहे, हेही या लेखात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन

मराठा आरक्षण आंदोलक पवारांवर नाराज का झाले?

तोतया लष्करी अधिकारी पुण्यातून अटक !

जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

भारत पुढील चार वर्षांत जगभरातील सर्वांत मोठी तिसरी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही या वर्तमानपत्रात व्यक्त करण्यात आला आहे. यात आयपीएलचाही उल्लेख करण्यात आला आहे. इंडियन प्रिमिअर लीग आता अमेरिकी फुटबॉल लीगच्या नंतर सर्वांत मौल्यवान लीग म्हणून ओळखली जात आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version