अपघातग्रस्तांसाठीच्या विमा योजनेचाच झाला घात

अपघातग्रस्तांसाठीच्या विमा योजनेचाच झाला घात

राज्य शासनाने कोविडच्या काळात अपघात ग्रस्तांना तातडीने मदत मिळावी म्हणून बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू केली होती. रस्त्यांवर अपघातात सापडलेल्या व्यक्तीला तत्पर वैद्यकीय मदत मिळून त्या व्यक्तीचे प्राण वाचावे किंवा अपंगत्वाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून ही योजना मागील वर्षी सुरू केली होती. परंतु या योजनेची सुरुवात कोणत्याही जिल्ह्यात आणि पालिका क्षेत्रात झालीच नाही. खाजगी आणि शासकीय रुग्णालयातही योजना कुठेही दिसून येत नाही.

बाळसाहेब ठाकरे अपघात विमा योजने अंतर्गत अपघात ग्रस्तांना अपघातग्रस्तांना आपत्कालीन ७२ तासात मोफत वैद्यकीय उपचार मिळतील असे या योजनेत म्हटले आहे. १६ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेला सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून मान्यता मिळालेली आहे. या योजनेची अंमलबजावणी १४ ऑक्टोबर २०२० पासून करण्यात आली. पण ही योजना कुठेही कार्यरत नसल्यामुळे रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

हे ही वाचा:

सागरी सुरक्षेसाठीची ही होती पंतप्रधान मोदींची पंचसूत्री

पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!

कोविड योद्धा मानत असाल तर अभियंत्यांना पदोन्नती द्या!

मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे ठाकरे सरकारचं धोरण

या योजनेअंतर्गत अपघातात सापडलेल्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय उपचार मिळाल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. अस्थिभंगाच्या रुग्णांना तांत्रिकदृष्ट्या योग्य उपचार देऊन स्थलांतरीत केल्यास त्यामुळे व्यक्तीचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. अपघातानंतर आवश्यक असणारे रक्त आणि रक्तघटक रुग्णाला तातडीने मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात असे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

वसईतील माहिती अधिकार कार्यकर्ता पराग तोडणकर यांनी या योजनेचे तपशील सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मागवल्यावर सदर योजनेची अजूनही अंमलबजावणीची प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याने ही योजना कुठल्याही जिल्ह्यात अजून सुरू नाही अशी माहिती देण्यात आली.

Exit mobile version