प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर! कोणी मारली बाजी?

पत्रकारिता क्षेत्रात मानाचा समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर! कोणी मारली बाजी?

पत्रकारिता क्षेत्रात मानाचा समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘असोसिएटेड प्रेस’ ही वृत्तसंस्था आणि ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्राला यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.

युक्रेन युद्धाच्या वृत्तांकनासाठी असोसिएटेड प्रेसला सार्वजनिक सेवेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. याशिवाय द न्यूयॉर्क टाईम्सला रशियाच्या घुसखोरीवरील वृत्तांकनासाठी आंतरराष्ट्रीय वार्तांकनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.

द असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला जनसेवा आणि ब्रेकिंग न्यूज छायाचित्रण अशा दोन विभागांत पुरस्कार मिळाला. द न्यूयॉर्क टाईम्सला आंतरराष्ट्रीय वार्तांकनासाठीचा पुरस्कार जाहीर झाला. युक्रेनमधील बुचा शहरात रशियन सैनिकांनी केलेल्या हत्यांचे वार्तांकन या दैनिकाने केले होते.

वॉशिंग्टन पोस्टचे वार्ताहर कॅरोलिन किचनर यांना त्यांनी मागील वर्षी अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताबाबत दिलेल्या निकालावर केलेल्या वार्तांकनासाठी राष्ट्रीय वार्तांकनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. सध्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये काम करत असलेल्या ईली सस्लोव यांना त्यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये केलेल्या कामासाठी फिचर लेखनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.

हे ही वाचा:

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, कर्नाटकमधील ‘हा’ समज बदलणार?

८६ वर्षीय डॉक्टरची नोकराने केली हत्या

‘चॅटजीपीटी’चा पहिला बळी; चीनमध्ये खोट्या अपघाताची बातमी करणाऱ्याला अटक

धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!

पत्रकारितेसाठी १५ विभागांत, तर पुस्तके, संगीत आणि नाट्य अशा क्षेत्रांतील कलाविषयक आठ गटात पुरस्कार देण्यात आले. सर्व विजेत्यांना प्रत्येकी १५ हजार डॉलरचे पारितोषिक दिले जाते. वृत्तपत्र प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांच्या प्रेरणेतून हे पुरस्कार सुरु करण्यात आले असून १९१७ मध्ये पहिला पुरस्कार देण्यात आला होता.

Exit mobile version