पोप फ्रान्सिस यांनी कॅनडात लहान मुलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल मागितली माफी

पोप फ्रान्सिस यांनी कॅनडात लहान मुलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल मागितली माफी

कॅनडाच्या दौऱ्यावर असलेले ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी कॅनडात कॅथलिक निवासी शाळांमध्ये लहान मुलांवर धर्मांतरासाठी झालेल्या अत्याचारांबद्दल माफी मागितली आहे. कॅनडा सरकारच्या अनुदानावर चाललेल्या आयोगाने अनेक वर्षांनी हे निष्कर्ष जाहीर केले. पोप यांनी मास्कवॅकिस येथे बोलताना मला माफ करा असे उद्गार काढले.

तेथील नागरिकांवर ख्रिश्चनांनी जे अनन्वित अत्याचार केले त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो, असे फ्रान्सिस पोप म्हणाले. पोप फ्रान्सिस हे एरमिनेस्कीन या मूलनिवासींच्या शाळेच्या जवळच या कार्यक्रमात बोलत होते. याच ठिकाणी शाळेत येणाऱ्या आणि नंतर मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची थडगी शोधण्यासाठी विशिष्ट रडारचा उपयोग करण्यात आला होता. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले, पण नेमका आकडा कधी बाहेर येऊ शकला नाही.

या निवासी शाळांमधील मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे करून त्यांना ख्रिश्चन करण्यासाठी प्रयत्न केले गेले. सरकारी शाळांमध्ये कॅनडातील मूलनिवासी असलेल्या दीड लाख मुलांना एकत्र आणण्यात आले होते. २०१५मध्ये या आयोगाने जो अहवाल सादर केला त्यानुसार या मुलांच्या मृत्युच्या भयानक कहाण्या समोर आल्या. या मुलांवर शारीरिक, मानसिक अत्याचार करण्यात आले. त्यातून त्या मुलांचे मृत्यू झाले. असे प्रकार कॅनडातील कोणत्याही अन्य शाळांत झाले नाहीत. अधिकृतपणे ४१२० मुलांचा या शाळांमध्ये मृत्यू झाला. त्यातील अनेकांना टीबी झाला होता. पण आयोगाने हे स्पष्ट केले की, खरी संख्या मात्र कधीही बाहेर येऊ शकणार नाही.

हे ही वाचा:

…म्हणून भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धेतून घेतली माघार

नरेंद्र मोदी तुमचे वडील नव्हते, मग त्यांचे फोटो वापरून का निवडणूक लढविली?

गुजरातमध्ये दारूने नाही तर रसायन प्यायल्याने लोकांचा बळी

सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरला

 

गेल्या वर्षी कॅमलूप्स मूलनिवासींच्या शाळेच्या जमिनीत २१५ मुलांची थडगी सापडली. एकेकाळी ही शाळा कॅनडातील सर्वात मोठी निवासी शाळा होती. १९५०मध्ये तेथे ५०० विद्यार्थी दाखल झाले होते.

Exit mobile version