जेवणाच्या वेळी नमाज करू इच्छिणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनीने कॅम्पसमध्ये प्रार्थनेवर बंदी घालणाऱ्या लंडनच्या कडक शाळेविरुद्ध मंगळवारी न्यायालयीन लढाई गमावली. विद्यार्थिनीने शाळेत प्रवेश घेतल्यानंतर तिच्यावर धार्मिक निर्बंध असतील, हे तिने मान्य केले होते, असे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सांगितले.
‘शाळा धर्मनिरपेक्ष आहे, हे तिला माहीत होते आणि ही शाळा कठोर असल्याचे माहीत असल्याने तिच्या आईला मुलीने तिथे शिक्षण घ्यावे, अशी तिची इच्छा होती,’ असे न्या. थॉमस लिंडन यांनी ८३ पानांच्या निर्णयात लिहिले आहे. शाळेत प्रार्थनेला परवानगी नसल्याने ती घरी परतल्यावर तिच्या चुकलेल्या नमाज म्हणायची.
मात्र शाळेच्या प्रांगणात प्रार्थना करू लागलेल्या विद्यार्थ्यांच्या एका लहान गटामुळे शाळेमध्ये फूट पडली. या फुटीचे पडसाद समाजात पसरले आणि बॉम्बचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शाळेने प्रार्थना करण्यास बंदी घातली. एका कृष्णवर्णीय शिक्षकाने नमाजपठण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विरोध केल्यानंतर त्याच्यावर ऑनलाइन याचिकेत ‘घृणास्पद वर्तन’ केल्याचा ठपका ठेवून वर्णद्वेषी अत्याचाराचा आरोप ठेवण्यात आला होता.
हे ही वाचा:
ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत नऊहून अधिक राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ होणार
रामनवमी: रावणाच्या अत्याचारातून मुक्तीसाठी भगवान विष्णूंचा सातवा अवतार
ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक
‘स्वतः आंबेडकरही भारताचे संविधान बदलू शकत नाहीत’!
वेम्बली परिसरातील ही उच्च-कार्यक्षम धर्मनिरपेक्ष शाळा आपल्या विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांवर कठोर नियम आणि शिस्तीसाठी ओळखली जाते. या शाळेत जवळपास अर्धी मुले मुस्लिम समाजातील आहेत.