“भारतीयांना इस्रायलशी असलेली मैत्री फार मौल्यवान आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. मंगळवारी ग्लासगो येथे COP26 हवामान शिखर परिषदेच्या वेळी इस्रायली पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण करून दिली आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याची ग्वाही दिली.
Indeed!
We shall continue working together for stronger bilateral ties and for a better planet.
The people of India deeply value the friendship with Israel. https://t.co/PEaJ6cFxkM
— Narendra Modi (@narendramodi) November 2, 2021
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासमवेत पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी बेनेट यांच्याशी संक्षिप्त भेटीत सौहार्दपूर्ण संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये, दोन्ही नेते त्यांच्या चर्चेदरम्यान दिलखुलास चर्चा करताना दिसले.
“खरंच! आम्ही मजबूत द्विपक्षीय संबंध आणि हवामानाच्या प्रश्नावर एकत्र काम करत राहू.” असे मोदींनी मंगळवारी ट्विटमध्ये म्हटले आहे. ते म्हणाले, “भारतीय लोक इस्रायलशी असलेल्या मैत्रीला खूप महत्त्व देतात.” पंतप्रधान बेनेट यांनी ट्विटमध्ये मोदींना उद्देशून म्हटले आहे की, “अखेरीस तुम्हाला भेटून खूप आनंद झाला.”
मोदी आणि बेनेट यांच्यातील ही भेट गेल्या महिन्यात जयशंकर यांनी इस्रायलच्या भेटीदरम्यान मोदींच्या वतीने इस्रायलच्या पंतप्रधानांना भारत भेटीसाठी आमंत्रण दिल्यानंतर झाली आहे.
इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान झालेले बेनेट पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान मोदींच्या इस्रायलच्या ऐतिहासिक भेटीदरम्यान भारत आणि इस्रायलने त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीकडे नेले आहे.
हे ही वाचा:
जगाचा दबाव झुगारून भारताने ठरवले २०७० चे लक्ष्य
धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!
‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’
आदित्यजी बघा, करंज्यात १०० हून अधिक खारफुटीची झाली कत्तल!
तेव्हापासून, दोन्ही देशांमधील संबंधांनी ज्ञान-आधारित भागीदारीचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामध्ये ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देण्यासह नावीन्यपूर्ण संशोधनातील सहकार्याचा समावेश आहे.